आळंदीपासून हरिनामात दंग होत दिंड्या आणि वारकऱ्यांचा सहप्रवासी बनलेला आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमकेदेखील पंढरीत दाखल झाल्याच्या आनंदात होता. त्याचे मार्गक्रमण सुरू असतानाच महागुरू नारदांनी फोन करून त्याच्या आनंदावर विरजण टाकले... नारायण!... नारायण!!नारद- शिष्या यमके, चिंता करू नकोस! मी तुझ्या वारीत अडथळा आणत नाही, पण अशात ज्या घटना घडत आहेत त्याबद्दल वारकºयांची प्रतिक्रिया काय आहे, हे इंद्रदरबाराला कळवायचे आहे. सगळ्या घटनांचा तपशील तुला दिला आहेच. वारकºयांच्या प्रतिक्रिया घेऊन रिपोर्ट दे. (पंढरीत गोपाळपूरजवळील दर्शन रांगेत दाखल झालेल्या यमके महागुरूंच्या आज्ञेनुसार हरिनामात दंग असलेल्या वारकºयांशी संवाद साधू लागला.यमके- माऊली... ‘जादू की झप्पी’बद्दल काही समजले का?वारकरी- ... हेच मज प्रेम देई देवा। डोळे भरूनिया पाहीन तुझे मुख... हेचि मज सुख देई देवा।।यमके- ती झप्पी मोदींना आवडली नाही म्हणे...वारकरी- भूत जबर मोठे गे बाई। झाली झडपण, करूगत काई... भूत लागले ध्रुव बाळाला... सदोदित।यमके- पण पवारसाहेबांना ती झप्पी पसंद पडली. माऊली, तुम्हाला काय वाटते?वारकरी- जे जे असेल प्रारब्धी! ते न चुके कर्म कधी... होणारा सारिखी बुद्धी। कर्मरेषा प्रगटे...यमके- उद्धवसेनेने तर झप्पीवाल्या राहुलबाबाला भाऊच बनविले...वारकरी- लेकराचे हित। वाहे माऊलीचे चित।। ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभाविण प्रीती।। पोटी भार वाहे। त्याचे सर्वस्वही साहे।।यमके- (रांगेतल्या दुसºया वारकºयांकडे विचारणा करीत...) माऊली, मराठा समाज देवेंद्रभाऊंना विठू माऊलीचे दर्शन घेऊ देणार नाही, असे ऐकतोय...वारकरी- करूनि उचित। प्रेम घाली हृदयात। आलों दान मागायास। थोर करूनियां आस। चिंतन समयीं। सेवा आपलीच देई। तुक्या बंधु म्हणे भावा। मज निरवावे देवा।यमके- एस.टी. बसची मोडतोड करत संतापलेल्या मराठा बांधवांनी आता काय करावे?वारकरी- ...झाले एकचित्त तरी बहुत। एवढ्यासाठी नका करू वाताहात गा। आलो येथवरी बहु सायास। करिता दान हेचि मागायास। नका भार घेऊ करूं निरास। धर्म सार फळ संसारास गा। ...बंधुभाव धरा। ओळखी नाही तरी जाल अघोरा गा।। (यमकेचा संवाद असतानाच पुन्हा नारदांचा फोन आला आणि नारद बोलू लागले...)नारद- शिष्या, आता हरिनामात दंग असलेल्या वारकºयांच्या भक्तीत व्यत्यय आणू नकोस. आषाढीच्या वैष्णवमेळ्यात तूही आनंदाने सहभागी हो. कारण त्यांना जादूच्या झप्पीत आणि मोदींच्या फेकाफेकीत रस नाही. त्यांची केवळ भक्तिरसावर श्रद्धा आहे.येमके- याल तरी यारे लागे!अवघे माझ्या मागे मागे!! आजि देतो पोटभरी! पुरे म्हणाल तोवरी!! हळू हळू चला ! कोणी कोणाशी न बोला!! तुका म्हणे सांडा घाटे ! तेणे नका भरूं पोटे!!... याच भावनेने देवेंद्रभाऊंनी आपल्या निवासीच विठुभक्तीचा निर्णय घेतला असेल ना!- राजा माने
जादू की झप्पी... जय हरी विठ्ठल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 5:05 AM