शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

देशाची परीक्षाव्यवस्था शिक्षण माफियांच्या मुठीत

By विजय दर्डा | Published: April 02, 2018 12:36 AM

देशभरातील विद्यार्थी सध्या रागावलेले आहेत. विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका एका पाठोपाठ एक फुटल्याने विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था आणखीनच वाईट आहे. कारण जे अभ्यास करत नाहीत ते अशा प्रकारे प्रश्नपत्रिका आधीच मिळवून चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होतात आणि प्रामाणिक विद्यार्थी मागे पडतात. पण मुळात या प्रश्नपत्रिका फुटतातच कशा हा खरा प्रश्न आहे? सीबीएसई व आयसीएसई या केंद्रीय मंडळांवर विविध राज्यांची परीक्षा मंडळे परीक्षा घेताना पूर्ण काळजी घेतात.

देशभरातील विद्यार्थी सध्या रागावलेले आहेत. विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका एका पाठोपाठ एक फुटल्याने विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था आणखीनच वाईट आहे. कारण जे अभ्यास करत नाहीत ते अशा प्रकारे प्रश्नपत्रिका आधीच मिळवून चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होतात आणि प्रामाणिक विद्यार्थी मागे पडतात. पण मुळात या प्रश्नपत्रिका फुटतातच कशा हा खरा प्रश्न आहे? सीबीएसई व आयसीएसई या केंद्रीय मंडळांवर विविध राज्यांची परीक्षा मंडळे परीक्षा घेताना पूर्ण काळजी घेतात. तरीही शिक्षण क्षेत्रातील माफिया त्यांच्या खबरदारीच्या भिंती सहजपणे भेदतात.यंदाच्या वर्षाविषयी बोलायचे तर सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील रसायनशास्त्र, अकाऊन्टन्सी, गणित आणि अर्थशास्त्र तर इयत्ता १० च्या परीक्षेतील गणिताचा पेपर फुटल्याच्या बातम्या आल्या. बरीच ओरड झाली. सीबीएसईने सुरुवातीस पेपरफुटी झाल्याचे साफ अमान्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर गणित व अर्थशास्त्र या विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचे त्या मंडळाने मान्य केले. तरीही ही पेपरफुटी फक्त दिल्ली राजधानी क्षेत्र व हरियाणात झाली म्हणून ही फेरपरीक्षा फक्त त्या भागांपुरतीच मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हल्ली समाज माध्यमे व दळणवळणाची एवढी वेगवान साधने उपलब्ध आहेत की, देशाच्या एका कोपºयात फुटलेला पेपर काही मिनिटांत दुसºया टोकापर्यंत सहज पोहोचविता येतो. कपिल सिब्बल यांचे म्हणणे ठीकच आहे की, पूर्वी एका भागात पेपर फुटला तरी परीक्षेची गोपनीयता फारशी बाधित होऊ नये व सुधारणेचे उपाय प्रभावी करता यावेत यासाठी एकच मंडळ विविध भागांमध्ये वेगवेगळ््या परीक्षा घेत असे. आताही तशाच परीक्षा व्हायला हव्यात. आताच्या परीक्षांमध्ये संपूर्ण देशात प्रश्नपत्रिका समान होत्या. त्यामुळे एका ठिकाणी पेपर फुटला तरी दुसºया ठिकाणच्या परीक्षांपुढे प्रश्नचिन्ह उभे राहणे स्वाभाविक आहे.आता जरा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडे नजर टाकू. या मंडळाच्या इयत्ता १० व इयत्ता १२ वीच्या परीक्षांचे पेपर फुटल्याचे प्रकारही घडले. खासगी कोचिंग क्लास चालविणाºया एका शिक्षकाने पेपर फोडल्याचे तपासातून समोर आले. सर्वच कोचिंग क्लासवाले असे उद्योग करतात असे नाही. परंतु त्यांच्यातील काही जण शिक्षण मंडळाचे अधिकारी व कर्मचाºयांच्या संगनमताने पेपर फोडतात. जे कुणी यासाठी पैसे मोजायला तयार असतात अशा अप्रामाणिक मंडळींच्या फायद्यासाठी हे सर्व केले जाते. एवढ्या मोठ्या रॅकेटमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असणार हेही उघड आहे. मुंबईत काही जणांना अटक झाली. पण पुन्हा असे करू पाहणाºयांना जरब बसेल अशी शिक्षा या लोकांना होईल का? मागचा अनुभव पाहता तशी शक्यता दिसत नाही.बरं ही पेपरफुटी केवळ शाळा-कॉलेजांच्या परीक्षांपुरती मर्यादित नाही. ज्याच्यावर लोकांच्या आयुष्यातील करियर अवलंबून असते त्या स्पर्धा परीक्षांचे पेपरही सहजपणे फुटत असतात. केंद्र सरकारच्या नोकºयांमधील कनिष्ठ कर्मचाºयांची भरती करणाºया ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’च्या (एसएससी) परीक्षेचे पेपर फुटल्याचेही प्रकरण यंदा घडले. परीक्षा देणाºया उमेदवारांनी दिल्लीत आठवडाभर निदर्शने केली, धरणे धरले. परंतु प्रश्नपत्रिका फुटल्याचा कमिशनने साफ इन्कार केला. याची चौैकशी केली गेल्याचे कमिशन म्हणते. पण ही चौकशी कुणी केली? त्यात कोण होते, हे कमिशनने उमेदवारांना सांगितले नाही. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशनच्या भरती परीक्षेचाही पेपर यंदा फुटला. मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळातील (व्यापमं) पेपरफुटीचा घोेटाळा हे याचे सर्वात गंभीर उदाहरण आहे. गेली पाच वर्षे त्याची चौकशी सुरू आहे. परीक्षा दिलेले शेकडो उमेदवार तुरुंगात आहेत, पण खरे गुन्हेगार मोकाटच आहेत. काही जण तुरुंगाची हवा खाऊन पुन्हा बाहेर आले आहेत.खरं तर आपल्या एकूणच शिक्षण व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. परीक्षेत कॉपी करणे हा तर शिक्षणाचा अविभाज्य भाग बनला आहे! जिला विषयांची नावेही माहीत नाहीत अशी रुबी राय बिहारमध्ये इयत्ता १२ वीच्या कलाशाखेच्या परीक्षेत कशी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली याचे उदाहरण जगजाहीर आहे. आपल्याकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे कुणी गांभीर्याने लक्ष देत नाही. ही शोकांतिका आहे. मुळात शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्न असताना शिक्षणाची गुणवत्ता कशी असेल हे वेगळे सांगायला नको. परिणामी आपल्या शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण, संस्कार व मूल्ये देण्यात अपयशी ठरत आहेत.विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यात व भारताला विकासाच्या मार्गावर नेण्यास आजचे शिक्षण खरंच उपयुक्त आहे का, याचा विचार सरकारने जरूर करायला हवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, आज जगातील सर्व विकसित व पुढारलेल्या देशांमध्ये संपूर्ण शिक्षण डिजिटल माध्यमांतून होत आहे. आपल्याकडे मात्र विद्यार्थी दप्तरांच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. अशा स्थितीत आपण जगाचे नेतृत्व कसे करणार? शिक्षण व्यवस्था गुणवत्तापूर्ण व मौलिक असेल तरच देश प्रगती करू शकतो हे विसरून चालणार नाही. म्हणून पेपरफुटी आणि परीक्षेतील कॉपी यासाठी कठोर शिक्षा व्हायला हवी.हे लिखाण संपविण्यापूर्वी...मध्य प्रदेशातील गोटेगाव येथील साजिद खान याने दाखविलेली बहादुरी व प्रसंगावधान खरोखरच प्रशंसनीय आहे. साजिद खान एका पेट्रोल पंपावर पेट्रोल उतरवत होते तेव्हा टँकरला अचानक आग लागली. टँकर तेथेच राहिला तर पेट्रोल पंपासह संपूर्ण वस्ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल हा धोका ओळखून त्यांनी टँकर पाच किमी दूर नेऊन एका निर्जन जागी उभा केला. अशी अक्कलहुशारी व धैर्य दाखविणारे साजिद खान हे खरे हीरो आहेत!

टॅग्स :examपरीक्षाCBSE Paper Leak 2018सीबीएसई पेपरफुटी प्रकरणeducationशैक्षणिक