टीम लोकमत दीपोत्सव उन्हाळ्याच्या आणि दुष्काळाच्या झळा सुरू झाल्या की रोजगार हमीचे काम हवे असलेले स्त्री-पुरुष रोजगार सेवकाच्या मदतीने शासनाच्या ‘नरेगा’ अॅपवर आपली मागणी नोंदवतात. मग काम सुरू होते.प्रत्येक मजूर स्मार्टफोनच्या स्क्रीनवर अंगठा टेकवून याच ‘नरेगा’ अॅपवर आपण कामावर आल्याची हजेरी लावतो..मजुरांनी केलेल्या कामाचे मोजमाप करण्यासाठी जीपीएस यंत्रणेचा वापर केला जातो. मोजमाप नोंदणीही एका स्वतंत्र अॅपवर केली जाते आणि त्या आधारे मजुरीचा हिशेब होतो. पैसे थेट बॅँकेत जमा होतात. गावातलाच एक सरकार नियुक्त माणूस पोतडीत ठेवलेले मोबाइल एटीएम घेऊन असतो. त्याच्याकडे जाऊन बायोमॅट्रिक ओळख दिली, की लगोलग पैसे काढून मिळतात.- हे तपशील तुम्हांला महत्त्वाचे वाटतात?गावखेडय़ाच्या मातीत तुमचे पाय कधी फारसे मळले नसतील, तर शक्यता थोडी कमी आहे.कारण तळहातात सामावलेल्या टेक्नॉलॉजीने आपल्या आयुष्यात आहे त्याहून आणखी रोमांचक असे काहीतरी सतत घडवत राहावे, अशीे सवय आणि अपेक्षा असलेल्या शहरी सर्वसामान्य माणसांचे रोजचे जेवण टेक्नॉलॉजीतून येत नाही.बदलत्या देशात आलेली आधुनिकता आणि प्रगतीच्या झंझावातात मागेच राहून गेलेल्या, कशातच हिस्सा न मिळालेल्या तळाच्या माणसाला मात्र या टेक्नॉलॉजीचा स्पर्श होतो, तेव्हा काय होते?- हे अनुभवायचे असेल, तर आंध्र प्रदेशात जावे..
मजुरांचे अंगठे जेव्हा अॅपवर टेकतात..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 3:09 PM