पल्या भोवताली हॅकर्स आणि हॅकिंगची चर्चा सतत सुरू असते. बोर्डच्या माध्यमातून सारे जग उद्ध्वस्त करण्याच्या गोष्टी आपण सिनेमात पाहतो, तसेच त्याच माध्यमाचा उपयोग करून जगाला वाचविण्यातही येते. ते अनुक्रमे ब्लॅक-हॅट हॅकर्स आणि व्हाईट-हॅट हॅकर्स म्हणून ओळखले जातात. त्यासाठी शॉर्टकटचा वापर अत्यंत चतुराईने करण्यात येतो. व्यवसायातही ग्रोथ हॅकर्स अस्तित्वात असतात, तसेच सोशल मीडियातही आपले दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी लाइफ-हॅक-टिप्स पुरविल्या जातात. कोणतीही नवीन कल्पना उद्योग जगताकडून जशी लगेच स्वीकारण्यात येते. त्याचप्रमाणे, ती निरर्थक ठरण्याचीही शक्यता असते.
एखाद्या यंत्रणेच्या अंतर्गत भागात प्रवेश करून नव्या उद्दिष्टांनी ती यंत्रणा बाधित करण्याचा हेतू हॅकिंगच्या मागे असतो. त्या यंत्रणेत हॅकिंगच्या माध्यमातून नवीन कल्पना घुसविल्या जातात. हॅकिंगला तोंड देणे आपल्याला शक्य होत नाही. कारण यंत्रणेतील ब्लॅक बॉक्सच्या प्रक्रियांना ते बाधित करीत असते. त्यामुळे ज्या हेतूंसाठी ती यंत्रणा तयार करण्यात येते, त्यात बिघाड घडवून वेगळेच काहीतरी करण्यास ते यंत्रणेला बाध्य करीत असते. हॅकिंगचा वापर यंत्रणेतील प्रक्रिया अगदी उलट करण्यासाठी होत असतो. आपल्याला काय साध्य करायचे आहे, या हेतूने आपण कामास आरंभ करतो, पण मग हॅकिंगमुळे मार्गभ्रष्ट होतो.
भारतात ‘जुगाड’ हा हॅकिंगचाच एक प्रकार आहे. घरगुती टिप्सचा जन्म हा जुगाड करण्यातूनच होत असतो. तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करण्यासाठी जुगाडचा वापर होत असतो. उकडलेल्या अंड्याच्या साली काढण्यासाठी, बीअरच्या बाटल्या उघडण्यासाठी किंवा यासारख्या असंख्य कारणांसाठी जुगाडचा वापर होत असतो. आपल्यात मानसिक बदल घडवून आणून दहशतवादास प्रवृत्त करण्याचे काम हॅकिंगमुळेच होते. त्यामुळे संस्कृतीचा वापर संस्कृती नष्ट करण्यासाठी केला जातो. हिंसाचाराचा वापर करून आपल्यात भयाची जाणीव निर्माण करण्यात येते. हेरगिरी करणे हाही हॅकिंगचाच प्रकार आहे. शत्रूला पराजित करणे हे जर उद्दिष्ट असेल, तर त्यासाठी युद्ध हा परंपरागत मार्ग असतो, पण हेरगिरी करणे विध्वंस घडवून आणणे हे एक प्रकारचे हॅकिंगच असते.
आपल्याला होणारे रोग हाही हॅकिंगचा सुसंस्कृत प्रकार असतो. स्वत:चे हेतू साध्य करण्यासाठी जंतूंच्या माध्यमातून आपल्या शरीरात विषारी घटकांचे प्रत्यारोपण करण्यात येते. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांसाठी औषधे हा तोडगा असतो. इम्युनोथेरपीच्या माध्यमातून आपल्यातील इम्युन सीस्टिम कार्यान्वित झाल्याने हाताळण्यास कठीण असलेल्या रोगांना हाताळणे सोपे जाते. मलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी हॅकरच्या मानसिकतेचा उपयोग केला जात आहे. मलेरियाच्या जंतूंचे वहन करू न शकणाºया डासांच्या नव्या जाती तयार करण्यात येत आहेत. मलेरिया नियंत्रित करण्याचा हा आणखी एक प्रकार आहे. जाहिरातबाजी हासुद्धा हॅकिंगचा एक सर्वमान्य प्रकार आहे. जाहिरात ही वरकरणी दृश्य स्वरूपात असते, पण तिचे परिणाम अदृश्य रूपात जाणवत असतात. जाहिरातींमुळे आपल्या वागणुकीलासुद्धा आपल्या नकळत वळण प्राप्त होत असते. मीडियामार्फतदेखील आपले हॅकिंग सुरू असते. खोट्या बातम्यांच्या माध्यमातून जगाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनात फरक पाडण्यात येतो. आपल्याला न जाणवता हा परिणाम होत असतो.प्रश्नांना तोंड देण्याची आपली पद्धत उघड उघड असते, पण मिळणाºया माहितीच्या बळावर उघड दिसणाºया गोष्टींवर आपण हल्ला करतो. इतरांना शिक्षित करून शत्रूला पराभूत करतो, पण तसे करताना आपण स्वत:लाच धोक्यात घालीत असतो. कधी-कधी प्रश्न सोडविण्यासाठी आपण बुद्धीचा वापर करतो, तसेच अधिक पैसेही खर्च करतो. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हॅकिंगतर्फे प्रत्येक साधनाचा वापर केला जातो.
व्यापक दृष्टिकोनातून विचार केला, तर संस्कृती हीसुद्धा हॅकिंगचे काम करीत असते. आपल्यातील कर्मठपणा हा संस्कृतीतून केलेल्या तर्कातून निर्माण झालेला असतो. आपल्याला अनुवांशिकतेतून प्राप्त झालेल्या मूलभूत सॉफ्टवेअरवर संस्कृतीच्या माध्यमातून नवीन प्रोग्राम आरोपीत केला जातो आणि मग तोच आपला कार्यक्रम बनतो! त्याच्या जपणुकीसाठी आपण आपली शक्ती खर्च करीत असतो, त्यासाठी नवीन सांस्कृतिक चळवळ, नव्या कल्पना आपण स्वीकारतो, पण संस्कृती हेही एकप्रकारचे हॅकिंग असते, हे आपण विसरतो. या दृष्टिकोनातून बघितले, तर आपण स्थापन केलेल्या अनेक संस्था हॅकिंगचेच काम करीत असतात.ही सारी उदाहरणे पाहिली, तर आपण तºहेतºहेच्या हॅकिंगच्या प्रकारांनी घेरलेले असतो. त्यातील काही प्रकार दृश्य असतात, तर काही अदृश्य असतात. त्याविषयी मनात जाणीव बाळगणे आणि त्याच्या प्रतिकारास सिद्ध राहण्याची भावनाही बळावते. एआय आणि बायोटेक्नॉलॉजीच्या वापरामुळे हॅकिंग हे अधिक भेसळयुक्त, तसेच अदृश्य होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सतत जागरूक राहून संशयास्पद अवस्थेत राहण्यापेक्षा भ्रमांना गोंजारीत त्यांना शरण जाणे हे अधिक सोपे असते!संतोष देसाईतंत्रज्ञानाचे अभ्यासक