(कवी हिंमाशु कुलकर्णी यांच्या ‘पणती जपून ठेवा, अंधार फार झाला’ या मूळ कवितेचे हे विडंबन.मंत्रालयातील उंदीरकांडावर! )आले चहुदिशांनी, वादळ आसंमानीफायली जपून ठेवा, उंदीर फार झाले ।आपुलेचि ओठ वैरी, जिव्हारी लागलेलेशब्द जपून ठेवा, उंदीर फार झाले।शोधात फायलींच्या, आहेत पारधी हेंआकडे जपून ठेवा, उंदीर फार झाले ।वैशाखी वणव्यात या, तापले रान सारेमुंडके जपून ठेवा, उंदीर फार झाले ।आगीत वास्तवाच्या, होईल बेचिराख सारेइमले जपून ठेवा, उंदीर फार झाले ।वेशात चिंतकांच्या, गारदी टपून बसलेलेऐवज जपून ठेवा, उंदीर फार झाले।नसतेच आपुले, अन् परके असे काहीझाकून सत्य ठेवा, उंदीर फार झाले।सत्ता शहामृगी, खुपते जिराफांनाफांदी उंच ठेवा, उंदीर फार झाले।वाडा जरी चिरेबंदी, झरोका तरी उघडामोरीस तोंड बुजवा, उंदीर फार झाले ।पंखा जरी टांगलेला, कुरतडतील दोर तेडोके जपून ठेवा, उंदीर फार झाले ।जातीय शहाण्यांचा, धर्म असे बुडालेलापंचा जपून ठेवा, उंदीर फार झाले ।स्वप्ने समृद्धीची, जागेपणी पाहावीउजेड पेरून ठेवा, उंदीर फार झाले।धरण बांधले उशाशी, तरी कोरड घशालाकालवे जपून ठेवा, उंदीर फार झाले।जगण्यापरी माणसांना, मरण स्वस्त आहेविष जपून ठेवा, उंदीर फार झाले।ना झरे अमृताचे, ना कल्पवृक्ष कोठेमृगजळ जपून ठेवा, उंदीर फार झाले।गोशाळी दुधाचे, पान्हे आटलेलेतान्हे सांभाळून ठेवा, उंदीर फार झाले ।अकल्प कल्पितांचा, हा खेळ साराडाव जपून ठेवा, उंदीर फार झाले।स्तुतीसुमनांचा, सुकाळ फार झालासांत्वन जपून ठेवा, उंदीर फार झाले।पंक्तीत पंत सारे, संगतीस नसे कोणीआसन जपून ठेवा, उंदीर फार झाले।कालचे ते आज, उद्याचे कोण जाणे?घड्याळ जपून ठेवा, उंदीर फार झालेअटकेपार भरारी, तरी पेशवाई बुडालीनगारे जपून ठेवा, उंदीर फार झाले।सत्तेच्या गलबतांना, बुडीचाच शाप आहेवल्हे जपून ठेवा, उंदीर फार झाले।सूर्याआड ढगांची, दाटी फार झालीकिरणे जपून ठेवा, उंदीर फार झाले ।
- नंदकिशोर पाटील
(nandu.patil@lokmat.com)