ध्यानधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:13 AM2018-05-11T00:13:02+5:302018-05-11T00:13:02+5:30

मन हे चंचल असते. एका क्षणात वर्तमान काळात, दुसऱ्या क्षणात भूतकाळात तर तिस-या क्षणात भविष्यकाळात. आता इथे तर दुस-या क्षणातच सात समुद्रापलीकडे! कधीकधी तर, शत्रू चिंतू नये ते मन चिंतते !

 Meditation | ध्यानधारणा

ध्यानधारणा

googlenewsNext

- प्रा. डॉ. संदीप ताटेवार

मन हे चंचल असते. एका क्षणात वर्तमान काळात, दुसऱ्या क्षणात भूतकाळात तर तिस-या क्षणात भविष्यकाळात. आता इथे तर दुस-या क्षणातच सात समुद्रापलीकडे! कधीकधी तर, शत्रू चिंतू नये ते मन चिंतते ! श्रीमद् भगवद् गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
बन्धूरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित:।
अनात्मान्स्तु शत्रुत्वे वर्ततात्मैव शत्रूवत ।।
म्हणजेच ज्याने मन जिंकले आहे. त्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे; परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्यासाठी त्याचे मन हे परम शत्रू आहे. जगतगुरु श्रीशंकराचार्य म्हणतात,
जिंत जगत केन। मनो ही येन ।।
माणसाच्या मनाचे वैशिष्ट्य म्हणजे सतत विचार करणे हे आहे. आपण शांत बसून असलो तरी आपल्या मेंदूतील काही भाग मात्र शांत होत नाही. तो सतत विचार निर्माण करीत असतो. या मेंदूच्या ठराविक भागाला डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणतात. आपल्या मनात सतत येणारे विचार आपल्या मेंदूला थकवतात. आपल्या मनात विचारांची शृंखला चालू असते. मनामध्ये नकारात्मक विचार जास्त असतात, ते आपल्या स्मृती पटलावर नकारात्मक भाव निर्माण करतात, त्यामुळे मेंदूची शक्ती खर्ची पडते. मग चिडचिड होते, मानिसक तणाव निर्माण होतो, शरीरातले हार्मोन्स असंतुलित होतात व त्याचे रूपांतर मधुमेह, रक्तदाब, थॉयराईडसारखे आजार निर्माण करतात. ध्यानामध्ये आपण आपले लक्ष श्वासावर, हृदयावर, प्रकाश ज्योतीवर, भगवंताच्या नामस्मरणावर केंद्रित करतो त्यामुळे मेंदूमधील इन्सुला नावाचा भाग सक्रि य होतो व सतत विचार करणारा मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क भाग शांत होतो. त्यामुळे त्याला विश्रांती मिळते व आपले मन शांत होते, आपल्याला ताजेतवाने वाटते, मनाची एकाग्रता वाढते व आत्मिक बळ मिळते.
जेव्हा तुम्ही ध्यान संपून उठता तेव्हा तुम्हाला अगदी प्रगाढ निद्रेने मिळालेली विश्रांती लाभलेली असते. ध्यानाच्या तीन अवस्था आहेत. पहिल्या अवस्थेला ‘धारणा’ असे म्हणतात. दुसºया अवस्थेला ‘ध्यान’ म्हणतात.
तिसºया अवस्थेला ‘समाधी’ असे म्हणतात. आज समाजात प्रत्येक जण ताणतणावात दिसत आहे. त्यामुळेच दिवसातून काही वेळ ध्यानधारणा करणे हिताचे ठरते. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा मानवी जीवनात ध्यानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. म्हणूनच अध्यात्मामध्ये ध्यानधारणेला अत्यंत महत्त्व आहे.

Web Title:  Meditation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.