शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

जैन धर्माने वाढवावा विश्वशांतीचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 5:10 AM

विजयकुमार चोप्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंसाचार आणि दहशतवाद जितक्या जवळून अनुभवला आणि त्याची किंमत मोजली, तेवढी या देशात खूप कमी कुटुंबांनी मोजली असेल.

काही दिवसांपूर्वी पंजाब केसरी वृत्तपत्र समूहाचे सर्वेसर्वा विजयकुमार चोप्रा पुण्यात एका कार्यक्र मासाठी आले होते. तेव्हा म्हणाले की, जैन धर्माचे आचार्य शिवमुनी पंजाबच्याच फरीदकोटचे आहेत. ते पंजाबी तर आहेतच. मात्र, केवळ जैन धर्मीयच नाहीत, तर जगभरच्या शांतता, अहिंसा या तत्त्वांवर विश्वास असणाऱ्या सर्व धर्मियांमध्ये त्यांचा मोठा सन्मान आहे. त्यांना भेटले पाहिजे. फाळणीची सर्वात जास्त झळ पंजाब आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांना बसली. मात्र, कोठेही गेलो, तेथे धर्म वेगळा जरी असला, तरी भाषा एकत्र आणण्याचे माध्यम आहे, याची जाणीव झाली. आम्ही पंजाबी असलेल्या आचार्य सम्राट शिवमुनी यांची पुण्यात चातुर्मासस्थळी प्रत्यक्ष भेट घेतली.

विजयकुमार चोप्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंसाचार आणि दहशतवाद जितक्या जवळून अनुभवला आणि त्याची किंमत मोजली, तेवढी या देशात खूप कमी कुटुंबांनी मोजली असेल. वडील लाला जगतनारायण, भाऊ रमेशचंद्र यांच्यासह या समूहाचे साठपेक्षा अधिक लोक दहशतवाद्यांकडून मारले गेले. ज्यांनी रक्ताचे पाट वाहताना पाहिले, बॉम्बस्फोटापासून गोळीबाराच्या आवाजात आणि बातम्यांमध्ये ज्यांचा दिनक्रम आजही सुरू होतो, ज्यांनी आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना हिंसाचाराचे बळी ठरताना पाहिले, त्यांच्या मनात हे युद्ध आणि संघर्ष पाकिस्तानला धडा शिकवेपर्यंत नेहमी चालला पाहिजे, अशी भावना असेल, असे मला वाटायचे आणि अशी भावना असणे ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते. मात्र, एकीकडे दहशतवादाविरोधात भूमिका घेताना शहीद रमेशचंद्र यांनी स्थापन केलेल्या शहीद परिवार फंडद्वारा विजयकुमार चोप्रा यांनी हजारो परिवारांचे, विधवांचे आणि अनाथांचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न केले.

विजयकुमार चोप्रा आणि आचार्य शिवमुनी यांची बराच वेळ चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा हे आचार्य शिवमुनी यांचे आशीर्वाद घ्यायला आले होते. त्याचा धागा पकडून विजयजी म्हणाले की, त्यांना आणि पंतप्रधानांना आता फक्त तुमच्यासारखे संतच काही सांगू शकतील. द्वेष आणि शत्रुत्व कायमस्वरूपी असू नये. सध्या एकूणच जगामध्ये महत्त्वाचे देश दहशतवादाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत, ती घेतलीच पाहिजे. मात्र, हळूहळू ती भूमिका दहशतवादाच्या विरोधात न राहता, विविध धर्म आणि जातींच्या विरोधात होऊ लागली आहे, हे मात्र काळजी वाटावी असेच आहे. ३४0 वे कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये निर्माण झालेली परिस्थिती किंवा या प्रश्नावरून पाकिस्तानात निर्माण झालेली परिस्थिती, एनआरसीच्या मुद्द्यावरून आसामात निर्माण झालेली परिस्थिती आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न अशा विषयांकडे पाहताना एक वेगळीच अस्वस्थता देशात आहे. नक्की आपण कोणत्यादिशेने चाललो आहोत? याच्यातून आपण जगातल्या शस्त्रांत्रांच्या व्यापाऱ्यांच्या हातात तर जाणार नाही ना?

आम्ही जगाला बुद्ध दिला आहे आणि आम्हाला युद्ध नको, असे पंतप्रधान जाहीरपणे म्हणतात. मात्र, त्याच वेळी हा नवा भारत आहे. घुसून मारेल, अशीही घोषणा करतात. देश चालविताना सामर्थ्यवान राहावेच लागते. मात्र, युद्ध अथवा प्रतिशोध हे सरकारचे धोरण होऊ नये, यासाठी जैन धर्मीयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण शांतता आणि विकासाची भूमिका मांडणाºया जैन तत्त्वज्ञानाला सर्व धर्मीयांमध्ये मान्यता आहे, असे जेव्हा विजयकुमार चोप्रा म्हणाले, तेव्हा आचार्य शिवमुनी महाराज उत्तरले, खरेच ही आज जगाची गरज आहे. मात्र, यासाठी माध्यमांनीही पुढाकार घ्यायला हवा. यावर वृत्तपत्रसृष्टीचे भीष्माचार्य समजले जाणारे विजयकुमार चोप्रा यांनी सद्यस्थितीत माध्यमांना अशा भूमिका घेणे अवघड असल्यानेच, जैन धर्मीयांनी विशेषत: जैनांमधील सर्व गटतटांनी व संतांनी ठामपणे आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत, असे सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘जैन धर्म हा देशाच्या आणि जगाच्या राजकारणावर, तसेच अर्थकारणावर प्रभाव टाकणारा आहे. त्याच वेळी वैदिक धर्माच्या अथवा इतर कुठल्याही धर्माच्या विरोधात न जाता आपल्या धर्मातील विश्वशांतीच्या मूळ तत्त्वाची जपणूक करीत जैन धर्मीयांनी आपली वाटचाल केली आहे.’ आज अर्थव्यवस्था संकटाकडे वाटचाल करीत आहे. उद्योगधंदे मोडकळीस येत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. अशा काळात समन्वयाची भूमिका मांडणाºया शक्ती शिल्लक राहिलेल्या नाहीत. समाजासाठी समर्पितपणे काम करण्याची भावना जैनांच्या रक्तातच आहे. मी माझ्या पंजाबमधील अनुभवानंतर सांगतो की, या देशातील सौहार्द, शांतता आणि बंधुभाव टिकला असेल, तर त्यात जैन धर्मीयांचे सर्वात मोठे योगदान आहे.

विजयकुमार चोप्रा यांची जैन धर्माचे श्वेतांबर स्थानकवासी आचार्य शिवमुनी यांच्याशी झालेली चर्चा आणि बैठक म्हणजे केवळ विश्वशांतीचा इव्हेंट नव्हता. आज भारतात जागतिक शांततेसाठी दरमहा दोनशेहून अधिक इव्हेंट होतात, पण अशा इव्हेंटमधून शांतता निर्माण होत नसते. आता शांततेच्या विचारांची पुन्हा एक वैश्विक चळवळ होणे आवश्यक आहे आणि ती क्षमता जैन धर्मीयांमध्ये निश्चित आहे. म्हणूनच जागतिक शांततेसाठी जैन धर्मीयांनी सर्व धर्मीयांना सोबत घेऊन घेतलेला पुढाकार हा बुद्ध आणि महावीरांच्या देशाने जगाला पुन्हा एकदा दिलेली देणगीच ठरणार आहे. ही देणगी दुर्बलतेचे नाही, तर सामर्थ्याचे प्रतीक असेल.

- संजय नहारसंस्थापक अध्यक्ष, सरहद