शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पेट्रोल भडक्याचा ट्रोल !

By सचिन जवळकोटे | Published: May 24, 2018 12:50 AM

पेट्रोल वाचविण्याच्या नादात उतारावर बंद केलेली गाडी खांबाला धडकल्यानं पिंट्याचा पाय लचकलेला.

पेट्रोल वाचविण्याच्या नादात उतारावर बंद केलेली गाडी खांबाला धडकल्यानं पिंट्याचा पाय लचकलेला. घरी विश्रांती घेत असतानाही त्याला पेट्रोलच्या महागाईचीच चिंता लागलेली. त्याच तिरीमिरीत त्यानं अंगावरची चादर झटकत एकेका नेत्याची भेट घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला नारायणदादांना गाठलं, ‘दादाऽऽ पेट्रोलचे भाव कधी कमी होणार? या प्रश्नावर दादा भलतेच गोंधळले. गेल्या दोन वर्षांत ‘तुम्ही मंत्री कधी होणार?’ या प्रश्नावरही कधी दचकले नसतील तेवढा विचित्र चेहरा त्यांचा झाला. ‘आम्हीच गॅसवर,’ या त्यांच्या उत्तरातून नेमका कोणता अर्थ काढावा, हे पिंट्याला समजलं नाही. सध्याच्या ‘सत्ता टंचाई’त बहुधा त्यांची गाडी ‘सीएनजी’वर चालत असेल, अशी भाबडी समजूत करून घेऊन पिंट्या सोलापूरच्या सुभाषबापूंकडं गेला. मात्र, त्यांच्या लाडक्या अविनाशनं त्याला बाहेरच थांबवलं. ‘बापू आतमध्ये कारवाईचा अभ्यास करताहेत,’ असं सांगितलं जाताच पिंट्या हसला. ‘कारवाई नेमकी कोणती? बापूंच्या लोकमंगलवर झालेली कारवाई की बापूंनी मार्केट कमिटीवर केलेली कारवाई...’ असा प्रतिप्रश्न करत पिंट्या बारामतीकडं गेला.बंगल्यात थोरले काका बारामतीकर आरशासमोर उभारून शर्टाची कॉलर उडवायची प्रॅक्टिस करीत होते. त्यांना पेट्रोलबद्दल विचारताच त्यांनी पार्टीचा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप दाखविला. त्यातला एक मॅसेज सर्वत्र गराऽऽगरा फिरविला जात होता. ‘मोठ्या साहेबांची चाणक्यनीती. त्यांच्या मध्यस्थीमुळं मंगळावरचं पेट्रोल व्हाया चंद्रावरून भारतात आणलं जाणार. साहेबांच्या दूरदृष्टीमुळंच पेट्रोलचे दर कमी होणार,’ हा मेसेज वाचताच घाम पुसत पिंट्या साताऱ्याकडं गेला. मात्र, तिथं नेहमीप्रमाणं थोरले राजे भेटलेच नाहीत. त्यांच्या म्हणे मुंबईत देवेंद्रपंतांसोबत बैठकांवर बैठका झडत होत्या. ‘एकवेळ पेट्रोलचे दर कमी होतील की नाही, हे आम्ही सांगू शकतो; पण साताºयाचे राजे हातात घड्याळ बांधणार की कमळाचं फूल घेणार, हे ब्रह्मदेवही सांगू नाही शकत.’ असा दावा खुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला.पिंट्या देवेंद्रपंतांकडं गेला. ते कुणाशी तर मोबाईलवर बोलत होते. ‘भविष्यात महाराष्टÑातही कर्नाटकसारखीच परिस्थिती उद्भवल्यास किती आमदार कसे गोळा करावे लागतील,’ या विषयावर पंत बोलत असल्याचं पिंट्याच्या लक्षात आलं. तिकडचा आवाजही पिंट्यानं बरोबर ओळखला. चक्क रायगडातल्या सुनीलभाऊंचा तो आवाज होता. ‘मातोश्री’वर ‘कुमारस्वामी’ निर्माण व्हायला नको, म्हणून आत्ताच्या विधान परिषदेपासूनच पंतांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं पिंट्याच्या लक्षात आलं.अखेर पिंट्या अमितभार्इंना भेटायला गुजरातेत गेला. ‘ओ भैऽऽ पेट्रोल के भाव कब पडेेंंगे?’ असं मोडक्या-तिडक्या हिंदीत विचारताच भाई एका वाक्यात उत्तरले, ‘इलेक्शन कमिशनर को पुछना पडेगा,’ गोेंधळलेला पिंट्या पुटपुटतच बाहेर पडला. ‘आता पेट्रोल दराचा अन् निवडणुकांचा काय संबंध?’ एवढ्यात त्याला कुणीतरी गदागदा हलवलं. ‘अरे ये पिंट्याऽऽ उठ की झोपेतून. स्वप्नात कसलं पेट्रोल स्वस्त होणार म्हणून बडबडतोय? आजचा पेपर बघ. पेट्रोलचे दर अजून दोन रुपयांनी वाढलेत.’

टॅग्स :Petrolपेट्रोल