Teachers' Day 2018: माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 03:27 AM2018-09-05T03:27:15+5:302018-09-05T03:27:40+5:30

शिक्षक दिनाला आपले गुरू, मार्गदर्शक आणि योग्य दिशा दाखविणाऱ्या आपल्या शिक्षकांना अभिवादन करतात.

Teachers' Day 2018: My Dear Student's Friends ... | Teachers' Day 2018: माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो...

Teachers' Day 2018: माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो...

Next

- डॉ. एस. बी. मुजुमदार
(सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक)

शिक्षक दिनाला आपले गुरू, मार्गदर्शक आणि योग्य दिशा दाखविणाऱ्या आपल्या शिक्षकांना अभिवादन करतात. मात्र, आजच्या शिक्षक दिनी माझ्यामधील शिक्षक, एका हरहुन्नरी विद्यार्थ्याप्रती आदराची भावना व्यक्त करू इच्छितो, जो विद्यार्थीदशेत पुणे विद्यापीठातील सक्रिय विद्यार्थी नेता होताच आणि सिंंबायोसिसच्या परदेशी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातही सहभागी झालेला होता.
आपल्या कामाशी बांधिलकी ठेवत, प्रामाणिकपणे केलेल्या अविरत मेहनतीमुळे हाच माझा विद्यार्थी आज भाजपाचा राष्ट्रीय प्रवक्ता आणि युनियन कॅबिनेट मिनिस्टर (HRD) अर्थात मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून कार्यरत असणारा विद्यार्थी म्हणजे ‘प्रकाश जावडेकर’.
मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात, बहुदा अनेक दशकांत, प्रथमच अनेक सकारात्मक बदल भारतीय उच्च शिक्षण प्रणालीमध्ये घडून येत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये अत्युच्च दर्जा प्राप्त करण्याचे ध्येय भारतासमोर आहे. त्यासाठी काही मोजक्या पारंपरिक तंत्रज्ञान व शास्त्रीय शिक्षण संस्थांच्या कीर्तीचे गुणगान करणे पुरेसे नाही, तर खासगी शिक्षण संस्थांना उच्च शिक्षणात सहभागी करून घेणे ही काळाची गरज आहे.
मानुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेली ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ ही योजना म्हणजे उच्च शिक्षणाचा दर्जा ठरविण्याचे ‘मानद’ किंवा मापदंड आहे.

जागतिक दर्जाच्या विद्यापीठांची निर्मिती -
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एकूण २० अभिमत विद्यापीठांची निर्मिती करण्याची घोषणा केलेली आहे. त्यातील १० खासगी, तर १० सरकारी क्षेत्रातील असतील. त्यांना संपूर्ण स्वायत्तता, तसेच एक हजार कोटींचे अनुदानही सरकारी शिक्षण संस्थांना देण्यात येईल. याचा ङ्खफायदा असा की, दर्जेदार शिक्षण संस्थांचा समावेश जागतिक श्रेणीच्या यादीमध्ये केला जाऊ शकतो. आताही तीन खासगी आणि दोन सरकारी शिक्षण संस्थांना Institute of Excellence(IOE) हा दर्जा दिला गेला आहे. या संस्था भारतीय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्याबरोबरच परदेशी विद्वान आणि विद्यार्थ्यांनाही भारताकडे आकर्षित करीत आहेत़
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मृत व्यापार, मानवी स्थलांतर, सेवांचे आदान-प्रदान या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने Study in India अर्थातच, ‘भारतामध्ये शिक्षण’ ही योजना या वर्षी १८ एप्रिल रोजी, मुख्यत: परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी कार्यान्वित केली आहे. नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठाने एके काळी जगभरातील विद्वान आणि विद्यार्थ्यांना आकर्षित केले होते, हे आपल्याला ज्ञात आहेच. ‘भारतामध्ये शिक्षण’ या योजनेंतर्गत आतापर्यंत दोन हजार विद्यार्थ्यांनी दर्जेदार विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आहे. हेच विद्यार्थी भारताबद्दल आस्था बाळगत अनौपचारिकरीत्या ‘भारताचे सद्भावना राजदूत’ म्हणून मायदेशी परततील.
शिक्षक दिनी या विद्यार्थ्याला मी आशिष देतो की, त्याचे असेच नेतृत्व देशाला अविरत मिळून, ज्ञानाने समृद्ध पायावर आपल्या भक्कम अर्थव्यवस्थेचा विकास होईल.

Web Title: Teachers' Day 2018: My Dear Student's Friends ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक