‘त्यापेक्षा पोरे जन्माला घाला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 05:26 AM2018-02-21T05:26:17+5:302018-02-21T05:26:21+5:30
‘नुसते रिकामे राहण्याऐवजी पोरे तरी जन्माला घाला’ हा नुकत्याच तुरुंगातून बाहेर पडलेल्या प्रज्ञा ठाकूर या ‘साध्वी’ने (?) तरुणाईला केलेला उपदेश किमान त्यांच्या पक्षातील, संघटनातील व त्यांच्या परिवारातील
‘नुसते रिकामे राहण्याऐवजी पोरे तरी जन्माला घाला’ हा नुकत्याच तुरुंगातून बाहेर पडलेल्या प्रज्ञा ठाकूर या ‘साध्वी’ने (?) तरुणाईला केलेला उपदेश किमान त्यांच्या पक्षातील, संघटनातील व त्यांच्या परिवारातील युवक-युवतींनी तरी गंभीरपणे घेतला पाहिजे. सारे जग लोकसंख्या कमी करण्याच्या प्रयत्नाला लागले असताना समाजाला नवी चेतना व नवा उत्साह देणारा हा संदेश आहे आणि सध्याच्या ‘अच्छे दिना’ला लागलेली गळती त्यामुळे थांबविता येणार नसली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करण्याएवढे बेफिकीरपणे तो साºया संबंधितांना देऊ शकणारा आहे. काही काळापूर्वी के. सुदर्शन या संघाच्या सरसंघचालकाने प्रत्येक हिंदू घरात किमान पाच मुले जन्माला आली पाहिजेत व त्यासाठी सगळ्या महिलांनी सज्ज असले पाहिजे असा सदुपदेश आपल्या धर्मग्रस्त अनुयायांना दिला. लगेच भाजपच्या दुसºया एका पुढाºयाने ‘पाचच का, दहा का नकोत’ असे म्हणत त्याच्या पुढची मजल गाठली. गेली काही वर्षे अतिरेकी व हिंसाचाराच्या कारवायात अडकलेली व तुरुंगात राहिलेली प्रज्ञा ठाकूर आता या साºयांवर कडी करीत रिकामटेकड्या वा सगळ्या बेकारांना एका ‘चांगल्या कामाचा’ संदेश द्यायला निघाली आहे. मदर नाही आणि मदरसा नाही, आता फक्त मुले हवीत. ती जन्माला घालायला आपल्या जवळचा रिकामा वेळ साºयांनी कामाला लावावा असेच तिने म्हटले आहे. स्त्री जातीवर लादली जाणारी ही आपत्ती, आपत्ती नसून त्यांच्या राष्ट्रप्रेमाला दिले जाणारे हे प्रबळ प्रोत्साहन आहे असे म्हणायला आता या प्रवाहातील काही बाळेही पुढे येतील. पूर्वी नोटाबंदीच्या काळात बँकांपुढे रांगा लावणाºयांच्या देशभक्तीला प्रोत्साहन द्यायला त्यांच्यासमोर देशप्रेमाची गाणी लावण्याचे उद्योग काही ‘देशभक्तां’नी केले. या साध्वीच्या आताच्या उपदेशामुळे अशी गाणी प्रत्येक घरासमोर किंवा बेरोजगारांच्या झुंडींसमोर लावून त्यांनाही त्यांच्या स्वदेश व स्वदेह भक्तीसाठी प्रयत्न झाले तर त्याचेही आश्चर्य वाटू देण्याचे कारण नाही. अशा शहाण्या देशभक्तांची संख्या आपल्याकडे कमी नाही. हा प्रकार स्त्रीस्वातंत्र्य व स्त्रीविकास यावर आघात करणारा आहे हा विचार यापुढे जो व्यक्त करील तो देशविरोधी व देशद्रोहीही कदाचित ठरविला जाईल. देश व धर्म यांच्या नावाखाली सर्वाधिक भरडला जाणारा वर्ग स्त्रियांचाच असतो या वास्तवाकडेही अशा देशभक्तीपायी आता बहुदा दुर्लक्षच केले जाईल. आश्चर्य याचे की या वेड्या वक्तव्यांना प्रसिद्धी का व कशी मिळते. कालपर्यंतचे घातपाती व गुन्हेगारीचे आरोप असलेले एकाएकी देशभक्तीपर व्याख्याने देतात तेव्हा त्यांच्या कृतीमागचे खरे स्वरूप देश व समाजाच्या लक्षात येते की नाही. अशा माणसांना व स्त्रियांना न्यायालये दोषमुक्त करते, त्यांच्या संघटना त्यांचे भरभरून स्वागत करतात, त्यांचे भगत त्यांची व्याख्याने लावतात आणि माध्यमांमध्येही त्यांना जागा मिळते. समाज व देश यांना त्याच्या वर्तमानाकडून भूतकाळाकडे नेण्याच्या या प्रकाराचा कुणी निषेध करीत नाही आणि तसा तो करणे हे पाप ठरण्याचे भय समाजाच्या मनात भरविले जाते. खरे तर असे प्रकार हाच एखाद्या कायद्यान्वये अपराध ठरविला गेला पाहिजे. असे सांगणे वा बोलणे हे समाजविरोधी व देशविरोधी कृत्य ठरविले गेले पाहिजे. त्यातला छुपा उपदेश लैंगिक गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारा म्हणून अपराधाच्या कक्षेत आणला पाहिजे. शस्त्रांनी माणूस मारता येतो पण अशा वक्तव्यांनी समाजाला मारले वा आंधळे बनविले जाते. त्यामुळे या गुन्ह्यांची कक्षा मोठी असते व तशी ती ठरविली गेली पाहिजे. आताचे सरकार यावर गप्प राहणार आहे. त्याचा परिवारही याविषयी मौन पाळणार आहे. मात्र त्यांची ती कृती इतरांनी आदर्श मानण्याचे कारण नाही. समाजाला अज्ञानाच्या व अंधश्रद्धांच्या अंधारात लोटणारी ही माणसे खºया अर्थाने समाजाशी द्रोह करणारी असतात. ती स्त्रियांना अन्यायाच्या खातेºयात लोटणारी आणि समाजातील गुंडगिरीला बळ देणारी असतात. त्याचमुळे अशा वक्तव्यांचा केवळ महिलांच्या संघटनांनीच नव्हे तर स्वातंत्र्य व समतेच्या बाजूने उभे राहणाºया साºयांनी कडाडून निषेध केला पाहिजे आणि तेवढ्यावर न थांबता त्याचे पुनर्वचन होणार नाही असे वातावरणही देश व समाजात निर्माण केले पाहिजे.