आजचा अग्रलेख - ‘वॉर अ‍ॅण्ड पिस’चा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 01:20 AM2019-09-03T01:20:31+5:302019-09-03T06:05:57+5:30

उमटविणारा हा देव आहे ‘वॉर अ‍ॅण्ड पिस’ ही काँऊंट लिओ टॉलस्टॉय यांची कादंबरी तुमच्या संग्रहात कशी

Today's editorial- The 'War and Peace' scandal | आजचा अग्रलेख - ‘वॉर अ‍ॅण्ड पिस’चा घोटाळा

आजचा अग्रलेख - ‘वॉर अ‍ॅण्ड पिस’चा घोटाळा

googlenewsNext

उमटविणारा हा देव आहे ‘वॉर अ‍ॅण्ड पिस’ ही काँऊंट लिओ टॉलस्टॉय यांची कादंबरी तुमच्या संग्रहात कशी ? ती दुसऱ्याच कुणा देशात झालेल्या युद्धाविषयी लिहिलेली असताना तुम्ही ती जवळ का बाळगता हा कोणत्याही सुबुद्ध माणसाला अचंबित व हतबुद्ध करणारा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयावरील एका न्यायमूर्र्तींनी कुणा आरोपीला विचारावा ही बाब अक्षर वाङ्मयात जगन्मान्य ठरणारी पुस्तके यापुढे आपण आपल्याजवळ ठेवावी की ठेवू नये असा संशय देशभरातील वाङ्मयप्रेमी स्त्री-पुरुषांच्या मनात उत्पन्न करणारा आहे. या प्रकरणातील आरोपी व्हर्नान गोन्साल्व्हिस हा एल्गार संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून गेल्या वर्षीच्या २८ ऑगस्टपासून तुरुंगात आहे. त्याला कोर्टासमोर हजर करताना पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेली जी पुस्तके व कागदपत्रे पुराव्यादाखल सादर केली त्यात या थोर ग्रंथाचा समावेश आहे. वास्तविक टॉलस्टॉयने ही कादंबरी १८६९ मध्ये लिहिली असून तीत फ्रान्सने रशियावर केलेल्या आक्रमणाचे व त्यानंतरच्या घटनांचे वर्णन आहे. साऱ्या कादंबरीत हिंसेचा निषेध व मानवी कल्याणाच्या टॉलस्टॉयने केलेल्या प्रार्थना आहेत.

गेली दीडशे वर्षे ही कादंबरी साºया जगाने डोक्यावर घेऊन तिला अक्षरसाहित्याचा सन्मान दिला. वॉर अ‍ॅण्ड पिस किंवा अ‍ॅना कॅरेनिना यासारख्या कादंबऱ्यांनी टॉलस्टॉयला केवळ कादंबरीकार म्हणूनच नव्हे तर एक थोर तत्त्वचिंतक म्हणून जगात मान्यता मिळवून दिली. म. गांधींनी द. आफ्रिकेत असताना आपला जो आश्रम उभा केला त्याला त्यांनी ‘टॉलस्टॉय आश्रम’ असे नाव दिले होते. टॉलस्टॉयच्या आयुष्याच्या अखेरच्या दोन वर्षात त्यांचा गांधींजीशी पत्रव्यवहारही होता. अशा लेखकाचे जगन्मान्य पुस्तक जवळ बाळगणे हा कायद्यानुसार आक्षेपार्ह प्रकार ठरत असेल तर आपण लोकशाहीत आहोत की हुकूमशाहीत असाच प्रश्न आपल्याला पडावा. आरोपीजवळ सापडलेल्या इतर कागदपत्रांविषयी न्यायमूर्तींनी आक्षेप घेतला असेल तर त्याबाबत कुणाचे काही म्हणणे असणार नाही. परंतु केवळ दुसºया देशात झालेल्या युद्धाविषयीचे पुस्तक आपल्याजवळ असू नये असे न्यायालयाला वाटत असेल तर दुसºया व पहिल्या महायुद्धाविषयीची सगळीच पुस्तके आपल्याला नष्ट करावी लागतील. तेवढ्यावर न थांबता फार पूर्वी होऊन गेलेल्या युद्धांविषयीची पुस्तकेही मग रद्दीत टाकावी लागतील. रामायण, महाभारत, कृष्णकथा यासारखे ग्रंथ तर मग वाचता येणार नाहीत. त्याचवेळी जगाच्या इतिहासात आजवर झालेल्या असंख्य युद्धांच्या कथाही आपण वाचू शकणार नाही. फार कशाला जी पुस्तके क्रांतीला किंवा सामाजिक व राजकीय बदलाला प्रोत्साहन देतात ती सुद्धा मग वर्ज्य मानावी लागतील. त्यात आपल्या संत साहित्याचाही समावेश होईल.

राजा राममोहनरॉय ते आंबेडकर आणि ज्योतिबा फुले ते महात्मा गांधी यांच्याही पुस्तकांवर मग बंदी आणावी लागेल. वॉर अ‍ॅण्ड पिससारखे विख्यात पुस्तक न्यायमूर्तींना ठाऊक नसेल वा त्याची महती त्यांना माहीत नसेल असे म्हणण्याचे धाडस आम्ही करणार नाही. तरीही त्यांचा हा प्रश्न आम्हालाही चकित व अंतर्मुख करणारा आहे. आपल्या संग्रहात किंवा ग्रंथालयात कोणती पुस्तके असावी, ही गोष्ट यापुढे न्यायालये आपल्याला सांगणार आहेत काय? की पुस्तके विकत घेत असताना आपल्यासोबत आपण वकील वा पोलीस सोबत ठेवायचा काय? देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अनेक नेत्यांनी त्यांच्या अनुभवावर आधारित ग्रंथ लिहिले आहेत. त्यात एकटे गांधीच नाहीत. अमेरिकेचे स्वातंत्र्यवीर, भारतातील क्रांतिकारक, मार्क्स, लेनिन यांचेही ग्रंथ आहेत. आणि ते क्रांतीला प्रोत्साहन देणारे आहेत. अशा ग्रंथांचे थोरामोठ्यांनी लिहिलेले संग्रह आपल्यापाशी बाळगणे ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यात गुन्हेगारी नाही. त्या ग्रंथातील काही बाबी आपल्या शस्त्राचाराच्या समर्थनार्थ कुणी वापरीत असतील तर मात्र तो गुन्हा ठरेल. तसे काही नसताना केवळ ही पुस्तके पुरावा म्हणून दाखल केली जात असतील तर तो आपल्या पोलीस खात्याच्याही अर्धवटपणाचा पुरावा ठरेल. यावर... चहूबाजूंनी टीका सुरू होताच न्यायालयाने आपली गफलत लक्षात घेऊन खुलासा केला की आपल्या समोर असलेले वॉर अ‍ॅन्ड पिस हे पुस्तक तिसºयाच कुण्या लेखकाचे आहे. मात्र तोपर्यंत संबंधित न्यायालयाचे व्हायचे तेवढे हंसे होऊन गेले होते.


टॉलस्टॉयला केवळ कादंबरीकार म्हणूनच नव्हे तर एक थोर तत्त्वचिंतक म्हणून जगात मान्यता मिळवून दिली. महात्मा गांधींनी द. आफ्रिकेत असताना आपला जो आश्रम उभा केला त्याला त्यांनी ‘टॉलस्टॉय आश्रम’ असे नाव दिले होते.

Web Title: Today's editorial- The 'War and Peace' scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.