शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल जाहीर: महायुतीची लाडकी बहीण जिंकली; आदिती तटकरेंचा विजय निश्चित
2
Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?
3
Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
4
Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: "महायुतीच्या विजयात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा, ऊर बडवण्याशिवाय..."; नेत्यांनी उडवली खिल्ली
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”
7
Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."
8
Vikhroli Vidhan Sabha Election Result 2024 Live : विक्रोळीत पुन्हा एकदा राऊतांचीच हवा, हॅटट्रिक साधणार?; ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर
9
"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंचा लागतोय कस, एकनाथ शिंदे ठरतायत सरस! असा आहे आतापर्यंतचा कल
11
Nanded Loksabha ByPoll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काय घडतेय? भाजप की काँग्रेस आघाडीवर...
12
Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोल्हापुरात कोणत्या मतदारसंघात कोणाची आघाडी? जाणून घ्या प्रत्येक अपडेट...
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र
14
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
15
Wayanad By Election Result 2024: प्रियांका गांधींची विजयाच्या दिशेने कूच! पहा आकडेवारी
16
Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Election Result 2024 : नवाब मलिक पराभवाच्या छायेत?; राष्ट्रवादी २४ हजार मतांनी पिछाडीवर
17
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
18
Karad North Vidhan Sabha Election Result 2024 Live : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर
19
Maharashtra Assembly Election 2024 Result : आशिष शेलारांच्या भावाकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांना टफ फाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर

उडदामाजी काळे-गोरे !

By सचिन जवळकोटे | Published: March 29, 2019 8:37 AM

पुन्हा एकदा कमळाचं ‘कल्याण’ झालं..

सचिन जवळकोटे

दीपकआबांच्या सोनके फार्म हाऊसवर सारे ‘घड्याळ’वाले अन् ‘हात’वाले जमले. गावागावात ‘संजयमामां’साठी बॉम्बगोळे लावण्याचं प्लॅनिंग केलं; मात्र यावेळी पंढरपूरची ‘कल्याण’ उदबत्ती गायब होती.. कारण म्हणे येत्या दोन-तीन दिवसात ‘कमळ’वाल्यांकडूनच लावली जाणारंय त्यांना जोरदार बत्ती. तिकडं ‘माण’च्या माळरानावरही फलटणच्या ‘रणजितदादां’साठी ‘कमळ’ फुलवायला ‘गोरे-गोरे’ हात आसुसलेत. याचाच अर्थ, माढ्यातील ‘कमळ’वाल्यांच्या सुपात ‘आघाडीचे काळे-गोरे’ खळखळणार असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झालेत.

  कॉलेजची पोरंही मोबाईलचं सिमकार्ड बदलत नसतील, इतक्या झपाट्यानं माढ्याच्या रणांगणातले कैक सरदार रंग बदलू लागलेत. सकाळी निमगावात ‘शिंदेंच्या गढी’वर दिसणारे चेहरे संध्याकाळी मुंबईत ‘वर्षा’वर झळकू लागलेत. ‘गद्दारी’च्या कडकडाटात ‘निष्ठे’चा गुलाल उधळण्यात कैकजण गुंतलेत. उजनीच्या बॅकवॉटरमध्ये बोटींग करताना ‘दोस्ती’च्या ‘आणाभाका’ घेणारी मंडळी आता एकमेकांना आयुष्यातून उठविण्याच्या ‘शपथा’ खाऊ लागलीत.

 पंढरपूरच्या प्रशांत मालकांनी अखेर गळ्यात ‘कमळाचा पंचा’ नेसला. माळशिरसच्या जानकरांनीही ‘संजयमामां’च्या मीठापेक्षा ‘देवेंद्रपंतां’चा मसाला अधिक ‘उत्तम’ असल्याचं ओळखलं. सांगोल्याच्या ‘शहाजीबापूं’नीही ‘गुलाल खोबरं तिकडं चांगभलंऽऽ’ म्हणत वाºयाच्या दिशेनं पाठ फिरविली. बार्शीच्या रौतांनी तर ‘गद्दारोंसे गद्दारी’ नावाचा सुपरहिट पिक्चरच काढण्याची घोषणा केली. फायनान्सर अर्थात ‘वर्षा’ प्रॉडक्शन. असो.

 ‘थोरले दादा अकलूजकरां’नीही काल ‘रणजितदादां’सोबत (फलटणच्या) छानऽऽपैकी ‘फोटो सेशन’ करत ‘कमळा’ची ‘फ्रेम’ही लोकांना दाखविली. ‘रणजितदादा खासदार व्हावेत,’ ही त्यांची आतली इच्छा अशा तºहेनं पूर्ण करण्याचा प्रयत्न असावा. भलेही ‘रणजितदादा’ हे नाव अकलूजऐवजी फलटणचं असलं तरीही..

   दोनच दिवसांपूर्वी ‘मी कुठं भाजपमध्ये गेलोय ?’ असा तिरका सवाल करणाºया याच थोरल्या दादांनी आता ‘भऽऽ भऽऽ भाजपचा’ अशी अकरा तालुक्यांची बाराखडीही पाठ केलीय...म्हणूनच की, प्रत्येक तालुक्यातले बॉन्ड्रीवरचे ‘घड्याळ’वाले कार्यकर्ते रोज अकलूजच्या दरबारात बोलाविले जाऊ लागलेत. ‘सोलापूर’ अन् ‘माढा’ या दोन्ही ठिकाणी यंदा जसं मतपत्रिकेला ‘शरद’ नावाचं वावडं ठरलं, तशीच अकलूजकरांची ‘शिंदे’ नावाविषयी असलेली ‘अ‍ॅलर्जी’ही दोन्हीकडं कळून चुकली. त्यामुळं यंदा थोरले दादा दोन्ही मतदारसंघात दोन्ही शिंदेंविरोधात उघडपणे तुतारी फुंकणार, हे निश्चित झालं.जाता-जाता : गेल्या काही दिवसांपासून अकलूजचे रणजितदादा पुण्या-मुंबईतच तळ ठोकून. तिथं बसूनच ते ‘संजयमामां’विरोधात जोरदार फिल्डिंग लावतायंत. सविस्तर साग्रसंगीत वृत्तांत ‘लगाव बत्ती’च्या पुढच्या भागात...

 मुंबईत मी माझ्या बँकेच्या कामासाठी काही मंडळींना भेटायला गेलो होतो. दोन-तीन दिवस मी तिथेच होतो. सोनकेच्या फार्म हाऊसवर ज्या दिवशी काँग्रेस-राष्टÑवादीची बैठक होती, त्याच्या आदल्या रात्रीच मुंबईतून प्रवास करत मी पंढरपुरात आलो. रात्रभर थकल्यामुळं दिवसभर विश्रांती घेत मी घरीच असल्यानं बैठकीला जाऊ शकलो नाही. - कल्याणराव काळे, काँग्रेस नेते, पंढरपूर

  कल्याणराव हे सध्या कॉँग्रेसचे समर्थक म्हणून ओळखले जात असले तरी भाजप नेत्यांशी त्यांची वाढत चाललेली जवळीक अत्यंत लक्षणीय. ते बुधवारी काँग्रेस-राष्टÑवादीच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याचं कारण ‘विश्रांती’ म्हणत असले तरी या आठवड्यात ते ‘भाजप’सोबत अधिकृतपणे माढ्याच्या मैदानात उतरतील. गेल्या विधानसभेला त्यांनी जवळपास ६५ हजार मतं मिळविली होती. विशेष म्हणजे, सोलापूर अन् माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील त्यांचे कार्यकर्ते विखुरलेले.

 माढा लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादीच्या उमेदवारासाठी सांगोला तालुक्यात बैठक बोलाविली होती, हेच मला माहीत नाही. मला कुणीही निमंत्रण दिलं नव्हतं. विशेष म्हणजे, आजपर्यंत राष्टÑवादीच्या एकाही नेत्यानं माढ्याबाबत माझ्याशी संवाद साधला नाही. त्यामुळं, भविष्यात त्यांनी बोलाविलं तर त्यांच्यासोबत जायचं का नाही, याचा मला विचार करावा लागेल.-आमदार जयकुमार गोरे, काँग्रेस, माण-खटाव

  जयकुमार हे जरी कॉँँग्रेसचे आमदार असले तरी सातारा जिल्ह्यात रामराजेंच्या विरोधात त्यांचीही स्वतंत्र अशी आघाडी; जशी सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटलांच्या विरोधात संजयमामांची होती. फलटणचे रणजितसिंह अन् जयकुमार यांच्या या आघाडीला साताºयाच्या उदयनराजेंचीही उघड-उघड साथ. त्यामुळं, हे रणजितदादा माढ्यात उभारल्यामुळं मिळणार मदतीचा ‘हात’. मात्र सध्या राष्टÑवादीत असलेले त्यांचे धाकटे बंधू ‘शेखर’ हेही ‘भाजप’बरोबर ‘टायअप्’ झाल्याची आतली ताजा खबर. फक्त दोघे एका स्टेजवर येणार नाहीत, याची घेतली जाईल काळजी.

- सचिन जवळकोटे

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJaykumar Goreजयकुमार गोरेSatara areaसातारा परिसर