शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

... पाकिस्तानवर तालिबानने कब्जा केला तर?

By विजय दर्डा | Published: January 02, 2023 8:44 AM

पाकिस्तानातील तहरीक-ए-तालिबानच्या मागे अफगाणिस्तानातल्या तालिबानने आपली ताकद उभी केली आहे. हे प्रकरण भविष्यात चिघळू शकते!

-  विजय दर्डा  (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

आपण उदंड उत्साहाने नववर्षाचे स्वागत करत असताना  काळजीत पाडणाऱ्या एक गोष्टीकडे मला निर्देश करायचा आहे... अर्थात, त्यापूर्वी मी माझ्या प्रिय वाचकांना नववर्षाच्या हार्दिक  शुभेच्छा देऊ इच्छितो. आपणा सर्वांना निरामय जीवन आणि अपार सौख्य लाभो... हरेक आव्हानाला समर्थपणे सामोरे जाण्याची शक्ती लाभो!

…तर तो चिंताजनक प्रश्न असा, की पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा रक्तरंजित खेळ खेळत असलेल्या तहरीक-ए-तालिबानने (टीटीपी) पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतली तर काय होईल? -  हा बिनबुडाचा प्रश्न मुळीच नाही. जागतिक दहशतवादी हालचालींवर लक्ष ठेवून असणाऱ्या  तज्ज्ञांच्या मनात हाच  प्रश्न आता दाटू लागला आहे. मुल्ला मोहम्मद उमर यांनी  तत्कालीन पूर्व पाकिस्तानात शांतता आणि संरक्षणाचा मंत्र जपत तालिबानची स्थापना केली, तेव्हा हीच संघटना पुढे अफगाणिस्तानची सत्ता आपल्या ताब्यात घेईल अशी कल्पना तरी कुणाच्या मनाला शिवली होती का? पुढे आपली सत्ता संपुष्टात आल्यावर  हीच संघटना वर्षानुवर्षे  अतिबलाढ्य अमेरिकेलाही  टक्कर देण्याची हिम्मत दाखवून पुन्हा तिथे सत्तेवर येईल असे तरी कुणाला वाटले होते का ? 

याच अफगाणी तालिबानच्या मदतीने प्रबळ झालेल्या  तहरीक-ए-तालिबानने (टीटीपी) टोळ्यांचे प्राबल्य असलेल्या मोठमोठ्या इलाख्यांपासून अगदी शहरांपर्यंत पाकिस्तानातील अनेक भागांत आपला दरारा प्रस्थापित केलेला आहे. वजिरीस्तानापासून  ते  थेट  खैबर पख्तुनख्वापर्यंत  त्यांचा दबदबा आहे. २००७ साली स्थापन झालेल्या या संघटनेने २००९ सालीच मेरीयट हॉटेलवर बॉम्ब हल्ला केला. सेनेच्या मुख्यालयांपासून ते पेशावरच्या सैनिकी शाळेपर्यंतच्या अनेक हल्ल्यांत याच संघटनेचा हात होता. या हल्ल्यात १३० हून अधिक शाळकरी मुलांचा बळी गेला होता.  ही रक्तरंजित कृत्ये आपणच घडविल्याचे टीटीपी उघडपणे कबूलही करते. वजिरीस्तान आणि खैबर पख्तूनख्वामधील कितीतरी जिल्ह्यांत पोलिस आपल्या ठाण्यातून बाहेर पडण्यास धजावत नाहीत. आपण साप पाळायचा आणि तो  फक्त शेजाऱ्यांनाच चावेल अशा भ्रमात राहायचे याला काही अर्थ नसतो. एक ना एक दिवस साप आपलाही चावा घेतोच! पाकिस्तानच्या बाबतीत नेमके हेच घडत आहे.

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतला तेव्हा पाकिस्तानने त्याला त्वरित मान्यता दिली होती.  कारण  तालिबान हे पाकिस्तानचेच अपत्य होते!   अफगाणिस्तानातील तालिबान प्रबळ होत जाताच पाकिस्तानातही टीटीपी मजबूत होत गेली. पूर्ण पाकिस्तान शरियत कायद्यानुसार चालविणे हेच त्यांचे उद्दिष्ट असल्याचे फर्मान  टीटीपीने  यापूर्वीच काढले होते. टीटीपीने पाकिस्तान विरुद्ध मोहीम सुरू केली. मोठमोठे हल्ले केले जाऊ लागले,  विशिष्ट अधिकाऱ्यांना लक्ष्य बनवून त्यांच्याही हत्या सुरू झाल्या. टीटीपीला काबूत ठेवण्यास अफगाणी तालिबान  आपल्याला साहाय्य करेल,  असा  विश्वास पाकिस्तानला वाटत होता; पण घडले नेमके उलटे. भरीला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या  सीमेवरच तणाव निर्माण झाला.

टीटीपीच्या ताब्यातील प्रदेशात त्यांच्याशी दोन हात करणे सोपे नाही, याची जाणीव  इम्रान खान सरकारला झाली. यावरूनच टीटीपीच्या सामर्थ्याचा अंदाज बांधता येतो. टीटीपीशी अफगाणिस्तानात  वाटाघाटी झाल्या. टोळीप्रमुखांचे दल, उलेमांचे प्रतिनिधी मंडळ आणि सरकारी अधिकाऱ्यांनी या वाटाघाटींत  भाग घेतला. त्यात आयएसआयचे तत्कालीन महासंचालक फैज हमीदही सहभागी झाले होते. महिनाभर संघर्ष थांबविण्याची घोषणा झाली. पुढे हा संघर्षविराम बेमुदत चालू ठेवण्याची घोषणा झाली; पण याच वेळी उमर खालिद खुरासानी या  अफगाणी तालिबानच्या  एका  प्रमुख नेत्याची हत्या झाली. काही महिन्यांच्या शांततेनंतर टीटीपीने  संघर्षविरामाचा  भंग केला आणि आपले हल्ले पुन्हा सुरू केले. सप्टेंबरपासून आजपर्यंत टीटीपीने  १३० हून  अधिक हल्ले केले आहेत. 

तालिबानने अफगाणिस्तानचा पुन्हा ताबा घेतल्यापासून पाकिस्तानातही टीटीपीचे रंगरूप झपाट्याने बदलले आहे. या संघटनेतली फाटाफूट  सांधून वेगवेगळ्या गटांची  एकी घडवून आणण्यात अफगाणी तालिबानने महत्त्वाचा वाटा उचलला आहे. नूर वली महसूद याच्या नेतृत्वाखाली आताची टीटीपी पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली बनली आहे. त्यांना शस्त्रास्त्रांची तर  मुळीच  वानवा नाही. अर्थात पाकिस्तानी सैन्याला युद्धाचा दांडगा अनुभव असल्याने टीटीपीचा मार्ग तसा सोपा  नाही; पण अफगाण तालिबान टीटीपीच्या मदतीला आली तर पाकिस्तानी सैन्य परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकेल का? मी केवळ  “सैन्य”च म्हणतो, कारण जनतेचे प्रतिनिधीच सर्व   निर्णय घेऊ शकतील अशी लोकशाही त्या देशात अस्तित्वात नाही. कुणी जनप्रतिनिधी  असा प्रयत्न करू पाहील तर सैन्य सरळ त्याला बाहेरचा रस्ता दाखवते. 

सैन्यानेच निर्माण करून पोसलेल्या  इतर डझनावारी दहशतवादी संघटनांचा वापर पाकिस्तान नेहमीच भारताविरुद्ध करत असतो. हेही सगळे दहशतवादी एका उद्दिष्टाने प्रेरित होऊन टीटीपीला मिळाले तर?  लागलीच असे काही होण्याची शक्यता आज  दिसत नाही; पण भविष्याच्या उदरात काय दडले आहे, कुणी सांगावे? अशी परिस्थिती उद्भवली तर ती केवळ भारताच्याच नव्हे, तर जगाच्याही दृष्टीने  एका भयावह काळाची नांदी ठरेल. याचे सर्वांत मोठे कारण हे की, आजवर कोणत्याच दहशतवादी संघटनेच्या हाती अण्वस्त्रे आलेली नाहीत... म्हणून जगाने वेळ निघून जाण्यापूर्वीच  सावध होण्याची नितांत आवश्यकता आहे. टीटीपी ही केवळ पाकिस्तानची समस्या  नाही. दहशतवादी लोक केवळ दहशतच निर्माण करत नाहीत, ते विकासाच्या मार्गात अडथळे उभे करतात. या दहशतवाद्यांचे दुष्ट उद्दिष्ट कधीही साध्य न होवो अशी प्रार्थना करत आपण मनोमन तसा विश्वासही  बाळगूया.

टॅग्स :TalibanतालिबानPakistanपाकिस्तान