- अतुल कुलकर्णीनारायण राणे दिल्लीत गेले आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याची स्वप्नं अनेकांना पडू लागली. त्या स्वप्नाने वेडे झालेल्यांसाठी नटसम्राट वि.वा. शिरवाडकर यांची क्षमा मागून हे स्वगत -कुणी, घर देता का? घर...?या नेत्याला कुणी घर देता का?अनेक अस्वस्थ नेते,पक्षासाठी कष्ट वेचलेले पदाधिकारी,मंत्र्यांसाठीच्या बंगल्यावाचून,मलबार हिलच्या हवेवाचून,मागे पुढे फिरणाºयाकार्यकर्त्यांच्या, अधिकाºयांच्या मायेवाचून,फेसाळणाºया लाटेच्या आवाजावाचून,नरेंद्र, देवेंद्रचा जप करत फिरत आहेत,मधेच अमितभाईचाही घोषा करत आहेत...!जिथून कुणी उठवणार नाही,असं घर ढुंढत आहेत,कुणी, घर देता का? घर...?काय रे देवेंद्राऽऽऽ, खरंच सांगतो बाबा,नेते आता थकून गेलेत...वर्षावर, सहाव्या मजल्यावर,चकरा मारून मारून तुटून गेलेत...दिल्ली ते नागपूर, नागपूर ते मुंबई...पुन्हा मुंबई ते वर्षा आणि...पुन्हा सहा सहा मजले चढून चढून...फिरून फिरून, दमून भागून...नेते, पदाधिकारी आता खरंच थकलेत...!कुणीतरी सांगून जातं,यावेळी तुमचाच नंबर पक्का आहे...सगळे पुन्हा मोरपिशी होतात,नव्या उमेदीनं परत परत,खुरडत खुरडत का असेना...इकडून तिकडे, तिकडून इकडे,चकरा मारत रहातात...खर सांगतो देवेंद्रा...या नेत्यांना नेतेपणच नडतंय रे,हे देवेंद्रा, नरेंद्रा... अमितभैया...कुणी तरी लक्ष घालता का रे...नेते मंत्र्यांसाठीच्या बंगल्यावाचून,नरेंद्र, देवेंद्रचा जप करत करत फिरत आहेत,अमितभाईचा घोषाही करत आहेत...!या पदाधिकाºयांना महाल नकोत,फार मोठे बंगलेही नकोत...मान नको, सन्मान नको...थैलीमधली भेट नको,हवीय फक्त एक खुर्ची,मानानं बसण्यासाठी,सोबत एक गाडी हवी,लाल दिवा असलेली,नेत्यांना, पदाधिकाºयांना बसण्यासाठी.किती दिवस बाहेरून येणाºयांसाठीसंतरंज्या टाकायचे काम करायचे...?किती दिवस तुमच्या मागे पुढे फिरायचे...?कधी तरी आमचाही विचार करा ना बाबांनो,मंत्रिपद नाही तर नाही,किमान महामंडळ तरी देता का बाबांनो...नाही तर सरळ नाही म्हणून सांगून टाका...जगण्याची आशाच आमचीक्षणात संपूवन तरी टाका...जाऊ आम्ही दुसºयाच्या दारी...तिकडून येऊ तुमच्यादारी...मग तुम्हीच आमच्यासाठी,पायघड्या घालून बंगले द्याल, खुर्च्या द्याल,हे देवेंद्रा, हे नरेंद्रा...कुणी, घर देता का? घर..?
या नेत्यांना कुणी घर देता का घर...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:33 AM