संमती पत्राअभावी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालक विद्यार्थी आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 11:06 AM2021-01-29T11:06:15+5:302021-01-29T11:09:41+5:30

ऐनवेळी प्रवेश रद्द झाल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती 

Eleventh grade students denied admission due to lack of consent letter parent students aggressive | संमती पत्राअभावी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालक विद्यार्थी आक्रमक 

संमती पत्राअभावी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालक विद्यार्थी आक्रमक 

Next
ठळक मुद्देऐनवेळी प्रवेश रद्द झाल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती असं का झालं याचा खुलासा करावा, पालकांची मागणी

कन्सेंट फॉर्म (संमती पत्र) नसल्याने अकरावीच्या ६५ विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश रद्द करण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेचा शेवटच्या टप्प्याचे अखेरचे ३ ते ४ दिवस शिल्लक असताना महाविद्यालयाने एकाएकी प्रवेश रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने सदर विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रचंड संभ्रमात आहेत व हवालदिल झाले आहेत. मुंबईतील चेंबूर येथील एनजी आचार्य आणि डी.के.मराठे कनिष्ठ महाविद्यालयात हा प्रकार घडला असून या ६५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शालेय शिक्षण विभागाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

अकरावी प्रवेशप्रक्रियेत अनेक नामांकित महाविद्यलयांत प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर अनेक महाविद्यालयांत ७५ टक्क्यांहून अधिक प्रवेश होऊन त्यांचे ऑनलाईन वर्ग ही सुरु झाले आहेत. अशातच विद्यार्थ्यांची नावे गुणवत्ता यादीत येऊन  त्यांनी महाविद्यालयांत जाऊन शुल्क भरून प्रवेश निश्चिती केल्यावर आता अचानक ६५ विद्यार्थ्यांची यादी लावून या सदर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याचे महाविद्यालयाकडून पालक विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. महाविद्यालयाकडून प्रवेश प्रक्रिया राबवताना प्रवेश निश्चित करताना घोळ झाला असून आता विद्यार्थ्यांना शिक्षा भोगावी लागावी लागणार असल्याचे आरोप पालकांनी केले आहेत.  मुंबई उपसंचालक कार्यालयाअंतर्गत ८४३ कॉलेजांमध्ये ही प्रक्रिया राबविली गेली तेथे असे काहीच झाले नाही. नेमके याच कॉलेजमध्ये असे का झाले याबाबत योग्य तो खुलासा होणे आवश्यक आहे, अशी मागणी पालकांच्या वतीने स्वाती पाटील यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपसांचालक कार्यालयही पत्र लिहिले आहे.

महाविद्यालयांत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश होत आहेत आणि संमतीपत्र हा प्रक्रियेचाच भाग आहे. मात्र वारंवार विद्यार्थ्यांना आठवण करूनही त्यांनी प्रवेश प्रक्रियेची ही पायरी वगळली असल्याने प्रवेश प्रक्रिया अपूर्णच राहिली असल्याची माहिती महाविद्यायच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले यांनी स्पष्ट केले. दरम्यान अकरावीच्या इतर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग व शिक्षण सुरु आहे. मात्र आक्रमक झालेले पालक अकरावीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश अचानक रद्द होत असेल तर आम्ही प्रवेश नेमके आता कुठे घ्यायचे ? असा प्रश्न विचारत आहेत.

या ६५ विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान नेमके काय झाले हे जाणून घेत आहोत याबाबत योग्य ती छाननी करुन पुढील कार्यवाही केली जाईल.
संदीप संगवे , उपसंचालक , मुंबई विभाग

Web Title: Eleventh grade students denied admission due to lack of consent letter parent students aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.