मुंबई : शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार ५० टक्के अंतर्गत मूल्यांकनासाठी त्यांच्या मागील वर्षीच्या म्हणजेच नववीच्या अंतिम निकालाचा आधार घेतला जाईल. सरल प्रणालीत नोंदविलेल्या माहितीनुसार ५० टक्के गुण दिले जातील.यंदा दहावीची परीक्षा देणे अपेक्षित असलेल्या आणि शैक्षणिक वर्ष २०१९-२० ला नववीची परीक्षा दिलेल्या राज्यातील १९ लाख ३४ हजार ९४ विद्यार्थ्यांची माहिती सरळ प्रणालीत नोंद केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. २०१९-२० ला नववीला असलेल्या या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ९४.६९ टक्के म्हणजेच १८ लाख ३१ हजार ३४४ विद्यार्थी राज्यात उत्तीर्ण होते. त्यापैकी केवळ १.२५ टक्के म्हणजेच जवळपास २४ हजार १०७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर ४ टक्के म्हणजे ७८ हजार विद्यार्थ्यांच्या माहितीची नोंद सरल प्रणालीत नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय १०० गुणांनुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येईल. गेल्या म्हणजेच २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस काेरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. मात्र, त्यापूर्वी नववीच्या विद्यार्थ्यांची दोन चाचणी परीक्षा आणि सहामाही परीक्षा झाली होती. त्याआधारे नववीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून, त्याची नोंद सरल प्रणालीत आहे. सर्व राज्यातील पालघर, ठाणे आणि मुंबई पालिका विभाग वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील २०१९-२० वर्षाचा नववीचा निकाल हा ९० टक्क्यांच्या वर असल्याचे दिसून आले आहे. या ३ जिल्ह्यांचा निकालही ८५ टक्क्यांहून अधिकच आहे. यंदाचा निकाल विद्यार्थ्यांना नववीच्या शैक्षणिक कामगिरीवर आधारित असाच असल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचे स्वागतच होत आहे.काही महत्त्वाच्या जिल्ह्यांतील नववीच्या मूल्यमापनाची आकडेवारी (२०१९-२०)जिल्हा विद्यार्थीसंख्या उत्तीर्णतेचे प्रमाण (टक्क्यांमध्ये) अनुत्तीर्णमुंबई (पालिका) १८,४२४ ८६.०२ ६. ५९मुंबई (डीव्हायडी) १,५६,८२९ ९३ २.८५ठाणे १,४३,६८६ ८८. २० ३. ०३
सरल प्रणालीत नोंदविलेल्या नववीच्या गुणांचा दहावीला आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 6:39 AM