पहाटेपासून कोल्हापूर शहरात धुक्याची झालर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:41 PM2021-02-17T12:41:56+5:302021-02-17T12:53:42+5:30
Temperature Kolhapur- हवामानात काहीसा बदल जाणवत असून बुधवारी सकाळी कोल्हापुरात धुक्याची दाट झालर सगळीकडे पसरल्याने सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी धुक्याची अनुभूती घेतली. कोल्हापूर शहरात मंगळवारी पहाटेपासून दाट धुक्याची झालर पसरली होती. शहरावर दोन तास धुक्याची चादर होती. तापमानातही काहीअंशी घट झाली आहे.
कोल्हापूर : हवामानात काहीसा बदल जाणवत असून बुधवारी सकाळी कोल्हापुरात धुक्याची दाट झालर सगळीकडे पसरल्याने सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी धुक्याची अनुभूती घेतली. कोल्हापूर शहरात मंगळवारी पहाटेपासून दाट धुक्याची झालर पसरली होती. शहरावर दोन तास धुक्याची चादर होती. तापमानातही काहीअंशी घट झाली आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी अंगाला बोचणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी जाणवत होती.
बुधवारी सकाळपासून वातावरणात काहीसा बदल जाणवत आहे. सकाळच्या आणि दुपारनंतरच्या वातावरणात मोठी तफावत जाणवत आहे. सकाळी थंडगार वारे वाहते आणि नंतर तापमान वाढत जाते. पहाटेपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दाट धुक्याची झालर पाहावयास मिळाली. धुक्याबरोबर गार वारे वाहत होते. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी हे बदललेले वातावरण अनुभवले.
सकाळी धुके असले तरी सकाळी आठनंतर तापमान वाढले आहे. दुपारी तापमान ३५ डिग्रीपर्यंत पोहोचेल. येत्या काही दिवसांत कमाल तापमान दोन डिग्रींनी कमी होणार असले तरी किमान तापमान ३५ डिग्रीपर्यंत राहणार आहे. ओडिसामध्ये चक्रीवादळाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान विभागाने येत्या चार दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
------------------------------------------
असे राहील तापमान डिग्रीमध्ये -
वार किमान कमाल
- बुधवार १८ ३५
- गुरुवार १८ ३१
- शुक्रवार १८ ३१