आचऱ्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या ४७ पिल्लांना समुद्रात सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 12:13 PM2021-04-09T12:13:54+5:302021-04-09T12:15:09+5:30
WildLife Sindhudurg-आचरा येथील समुद्र किनाऱ्यावर २ महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती ही अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडयांचे संवर्धन करीत त्यांनी बुधवारी वनकर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कासवाच्या ४७ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.
आचरा : आचरा येथील समुद्र किनाऱ्यावर २ महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती ही अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडयांचे संवर्धन करीत त्यांनी बुधवारी वनकर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कासवाच्या ४७ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.
यावेळी आचरा ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पिल्लांचे संवर्धन करणारे सूर्यकांत धुरी, वनरक्षक सारिख फकीर, वनपाल श्रीकृष्ण परीट, वनमजुर, अनिल परब यावेळी उपस्थित होते.
यापूर्वी ही अंडी जंगली प्राणी, भटके श्वान तसेच लोकांकडूनही नष्ट केली जात होती. परंतु, महाराष्ट्र शासन वनविभागामार्फत कासव संवर्धन मोहीम राबविण्यात येत असल्याने आता समुद्रकिनाऱ्यावर आढळलेली अंडी कासव संवर्धन केंद्रामध्ये संवर्धित केली जात आहेत. त्यातून पिल्ले तयार झाल्यावर ती पुन्हा समुद्राच्या पाण्यात सोडली जातात.
गेली दहा वर्षे ही मोहीम सुरू आहे. कोरोना काळातही जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धन मोहीम मोठ्या जोमाने सुरू आहे.निसर्ग वादळ आणि वातावरणातील बदलामुळे यावर्षी विणीचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे.