रत्नागिरीच्या मिऱ्या येथे होणार प्राणीसंग्रहालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 04:37 PM2020-10-30T16:37:06+5:302020-10-30T16:38:43+5:30
environment, Uday Samant, wildlife, Ratnagiri रत्नागिरी नजीकच्या मिऱ्या येथील १० हेक्टर (२२ एकर) जागेवर प्राणीसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : रत्नागिरी नजीकच्या मिऱ्या येथील १० हेक्टर (२२ एकर) जागेवर प्राणीसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पूर्वी या प्राणी संग्रहालयासाठी आरे-वारे येथील जागेचा विचार करण्यात येत होता. मात्र, याठिकाणी सीआरझेड कायद्याचा अडसर येईल, हे लक्षात घेऊन आता मिऱ्या येथील जागा निश्चित करण्यात येत आहे. ही जागा समुद्रकिनारी आहे.
या ठिकाणी प्राणीसंग्रहालय उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सारंग कुलकर्णी यांची समिती नेमण्यात आली आहे. रत्नागिरीतील पर्यटन वाढण्याच्या दृष्ष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत, त्यासाठी प्राणीसंग्रहालय उभारण्यात येत आहे.
औरंगाबाद, पुणे महानगर पालिका आणि परराज्यातील म्हणून जयपूर येथील प्राणीसंग्रहालय या प्रकल्पाला क्लब करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री सामंत यांनी दिली. रत्नागिरीत होणारा हा प्रकल्प मध्यम स्वरूपाचा असणार आहे. त्यात १०० ते १५० प्राण्यांचा समावेश असेल. या प्रकल्पात प्राणी ठेवण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून समुद्राखालचं जग बनविता आलं, तर त्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर येणारे महसूल मंत्री अब्दुल सत्तार हे सोडवणार आहेत. मध्यम प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाची जबाबदारी वन विभागाने घेतली आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
उदय सामंत म्हणाले...
४पुण्याप्रमाणेच रत्नागिरीत मि�या येथे ह्यस्नेक पार्कह्य बनविण्यात येणार आहे.
४आरोग्य, पर्यावरण यादृष्ष्टीने रत्नागिरीत प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे. त्यातून रोजगार निर्मिती होईल.
४शासकीय तंत्रनिकेतनसाठी २५ कोटी मंजूर.
४पुढच्या वर्षी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार.
रत्नागिरीच्या मि�या येथे होणार प्राणीसंग्रहालय
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी नजीकच्या मि�या येथील १० हेक्टर (२२ एकर) जागेवर प्राणीसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली अस�याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पूर्वी या प्राणी संग्रहालयासाठी आरे-वारे येथील जागेचा विचार करण्यात येत होता. मात्र, याठिकाणी सीआरझेड कायद्याचा अडसर येईल, हे लक्षात घेऊन आता मि�या येथील जागा निश्चित करण्यात येत आहे. ही जागा समुद्रकिनारी आहे. या ठिकाणी प्राणीसंग्रहालय उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सारंग, कुलकर्णी यांची समिती नेमण्यात आली आहे. रत्नागिरीतील पर्यटन वाढण्याच्या दृष्ष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत, त्यासाठी प्राणीसंग्रहालय उभारण्यात येत आहे. औरंगाबाद, पुणे महानगर पालिका आणि परराज्यातील म्हणून जयपूर येथील प्राणीसंग्रहालय या प्रकल्पाला क्लब करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री सामंत यांनी दिली. रत्नागिरीत होणारा हा प्रकल्प मध्यम स्वरूपाचा असणार आहे. त्यात १०० ते १५० प्राण्यांचा समावेश असेल. या प्रकल्पात प्राणी ठेवण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून समुद्राखालचं जग बनविता आलं, तर त्यासाठीही प्रयत्न सुरू अस�याचे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. यासाठी लागणा�या जागेचा प्रश्न शुक्रवारी जिल्हा दौ�यावर येणारे महसूल मंत्री अब्दुल सत्तार हे सोडवणार आहेत. मध्यम प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाची जबाबदारी वन विभागाने घेतली आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
उदय सामंत म्हणाले...
४पुण्याप्रमाणेच रत्नागिरीत मि�या येथे ह्यस्नेक पार्कह्य बनविण्यात येणार आहे.
४आरोग्य, पर्यावरण यादृष्ष्टीने रत्नागिरीत प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे. त्यातून रोजगार निर्मिती होईल.
४शासकीय तंत्रनिकेतनसाठी २५ कोटी मंजूर.
४पुढच्या वर्षी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार.