Reliance Jioचे 555 रुपयांचे रिचार्ज मिळतेय मोफत; जाणून घ्या व्हॉट्सअॅप मॅसेजमागचे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 02:16 PM2021-03-30T14:16:13+5:302021-03-30T14:18:34+5:30
Reliance Jio 555 recharge Free: मुकेश अंबानींच्या नातवाच्या जन्मदिनानिमित्त 555 रुपयांचे रिचार्ज फ्रीमध्ये दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर रिलायन्स जिओद्वारे 555 रुपयांचे रिचार्ज मोफत मिळत असल्याचा मेसेज आला तर त्य़ावर क्लिक करू नका. सोशल मिडीयावर एक मसेज फॉरवर्ड केला जात आहे. यामध्ये मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) नातवाच्या (Grand son) जन्मदिनानिमित्त 555 रुपयांचे रिचार्ज फ्रीमध्ये दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Reliance Jio 555 Free recharge message.)
व्हॉट्सअॅपवर हा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये युजरला त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जात आहे. हा मेसेज खोटा असून त्यावरील लिंकही फेक आहे. रिलायन्स जिओ अशाप्रकारची कोणतीही ऑफर आपल्य़ा ग्राहकांना देत नाहीय. हिमाचल प्रदेशच्या सायबर क्राईम पोलिसांनी याबाबत ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी या मेसेजमधील लिंक फेक असल्याचे म्हटले आहे. युजरनी या वेबसाईटवर जाऊ नये असा सल्ला देण्य़ात आला आहे.
काय म्हटलेय मेसेजमध्ये...
व्हॉट्सअपवर फॉरवर्ड होत असलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, रिलायन्स जिओ सर्व युजरसाठी 555 रुपयांचा प्लॅन फ्रीमध्ये देत आहे. मुकेश अंबानींना नुकताच नातू झाला, त्यानिमित्त हे रिचार्ज फ्री दिले जात असल्य्याचे म्हटले आहे. 'As Mukesh Ambani becomes grandfather, all the Jio users are being given free recharge worth Rs 555. I have received the free recharge, so can you. In order to avail of the offer click on https://c***.ly/N***arg link (name hidden for users to avoid clicking on it). The offer is valid only till March 30.', असा तो मेसेज आहे. या मेसेजमधील लिंक वाचकांनी क्लिक करून नये म्हणून बदलण्यात आली आहे.
रिलायन्स जिओने अशाप्रकारच्या कोणत्याही ऑफरची घोषणा केलेली नाही. या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यावर युजर दुसऱ्या व्हायरस असलेल्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होत आहे. जर तुम्हाला असा मेसेज मिळाला असेल तर कृपया त्या लिंकवर क्लिक करून नका, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. या लिंकवर क्लिक केल्याने तुमची खासगी माहिती, बँक खात्याचे तपशील लीक होण्याची शक्यता आहे.