चेतन भगतवर पुन्हा टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:15 AM2016-01-16T01:15:46+5:302016-02-13T01:12:42+5:30

देशात वाढणार्‍या असहिष्णुतेला घेऊन सध्या जो तो आपापल्या परीने भाष्य करीत आहे

Commentary on Chetan Bhagat again | चेतन भगतवर पुन्हा टीका

चेतन भगतवर पुन्हा टीका

Next
शात वाढणार्‍या असहिष्णुतेला घेऊन सध्या जो तो आपापल्या परीने भाष्य करीत आहे. वाढत्या धार्मिक हिंसाचाराला आळा घालण्यात सरकार अपयशी पडत असून या निषेधार्थ अनेक मान्यवर लेखक, दिग्दर्शकांनी सरकारतर्फे देण्यात आलेले सन्मान परत केले आहेत. प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार चेतन भगतने आता या वादामध्ये उडी घेतली आहे. मात्र यावेळी त्याच्या बडबोलेपणामुळे त्याला मोठय़ा प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. चेतनने ट्विट केले, की या बुद्धिवाद्यांना का वाटत आहे की सगळे भारतीय असहिष्णू आहेत. दोन चार लोकांमुळे संपूर्ण सरकारला वेठीस धरणे योग्य नाही. इतिहासकारांवर तोंडसुख घेताना तो लिहितो, मला खरंच कळत नाही. की इतिहासकार काय करतात? आधी हे झाले, मग ते झाले. बस्स इतकेच त्यांचे काम. अशा खोडसळ वक्तव्यांमुळे चेतनच्या विरोधात फार मजेशीर ट्विट केले गेले. चेतन तुझा पत्ता सांग. तू लिहिलेली पुस्तके परत करायची आहेत या नियमाने तर मग धावपटू केवळ एका मागून एक पाऊल टाकतात, चित्रकार केवळ इकडे तिकडे ब्रश फि रवतो. सेक्स आणि थिल्लरपणा शिवाय चेतन भगत लिहितो तरी काय?

Web Title: Commentary on Chetan Bhagat again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.