​क्रेडिट कार्ड स्कोरवरून काढतो येतो ‘रिलेशनशिप’चा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2016 08:30 AM2016-06-10T08:30:25+5:302016-06-10T14:00:25+5:30

क्रेडिट स्कोरवरून तुमचे नाते किती वेळ टिकेल याचा अंदाज व्यक्त करता येतो.

Credit card scores can be drawn from the 'Relationships' estimation | ​क्रेडिट कार्ड स्कोरवरून काढतो येतो ‘रिलेशनशिप’चा अंदाज

​क्रेडिट कार्ड स्कोरवरून काढतो येतो ‘रिलेशनशिप’चा अंदाज

Next
काल क्रेडिट-डेबिट कार्डवरच सहसा खरेदी केली जाते. क्रेडिट कार्डच्या वापरानुसार तुम्हाला पॉर्इंट्स/स्कोर मिळातो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या क्रेडिट स्कोरवरून तुमचे नाते किती वेळ टिकेल याचा अंदाज व्यक्त करता येतो.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड, द ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशन आणि यूसीएलए यांनी तयार केलेल्या एक रिपोर्टनुसार तुमचे व जोडीदाराचे के्रडिट स्कोर जितके जास्त चांगले, तितके तुमचे नाते टिकून राहण्याची शक्यता अधिक असते. 

‘क्रेडिट स्कोर अँड कमिटेड रिलेशनशिप्स’ नावाचा हा अहवाल 49363 जोडप्यांकडून माहिती गोळा करून तयार करण्यात आला आहे. त्याुनसार, के्रडिट स्कोरमध्ये प्रत्येक 105 पॉर्इंटच्या वृद्धीसह नाते अस्तित्वात आल्याच्या सहावर्षांमध्य ब्रेक अप होण्याची शक्यता 32 टक्क्यांनी कमी होते.

मानसशास्त्रज्ञ अर्लिन गोल्डमन यांनी माहिती दिली की, अधिक क्रेडिट स्कोर असलेले लोक मुळातच अधिक जबाबदारीने वागणारे असतात. लग्न किंवा वेगळे होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ते सजगपणे दीर्घकालीन परिणामांचा सारासार विचार करूनच निर्णय घेण्याची त्यांची वृत्ती असते. म्हणून तर अशा लोकांच नाते अधिक काळ टिकते.

Web Title: Credit card scores can be drawn from the 'Relationships' estimation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.