काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पक्षामध्ये मोठा बदल करत काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी आपली बहिण प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर सोपवली आहे. तसेच त्यांच्यावर उत्तर प्रेदशच्या पूर्व भागाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये प्रियंका गांधी आपला कार्यभार सांभाळणार असून त्यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे. कारण प्रियंका गांधींची राजकारणातील एन्ट्रीकडे 2019च्या लोकसभा निवडणूकांसाठी मास्टर स्ट्रोक म्हणून पाहिलं जात आहे.
तसं पाहायला गेलं तर राजकारणामध्ये प्रियंका यांचं येणं ही काही पहिली वेळ नाही. याआधीही प्रियंकाने 2009मध्ये अमेठी आणि रायबरेली निवडणूकांदरम्यान राहुल गांधी यांना मदत केली होती. परंतु यावेळी राहुल गांधींनी प्रियंकाला फार मोठी जबाबदारी दिली आहे. ज्यामुळे प्रियंका गांधी अप्रत्यक्षपणे नाही तर प्रत्यक्षपणे राजकारणाच्या मैदानात उतरल्या आहेत.
आजीचीच सावली आहेत प्रियंका गांधी
प्रियंका गांधी या त्यांची आजी इंदीरा गांधी यांचीच सावली समजल्या जातात. मग इंदीरा यांची हेअर स्टाइल असो किंवा साडी नेसण्याची पद्धत. प्रियंका हुबेहुब त्यांना फॉलो करताना दिसून येतात. प्रियंका यांच्या चेहऱ्यापासून ते त्यांच्या भाषण देण्याच्या शैलीपर्यंत सर्व गोष्टी इंदीरा गांधीशी मिळत्या जुळत्या आहेत. परंतु, याव्यतिरिक्त प्रियंका गांधींची साडी नेसण्याची पद्धतही आजीप्रमाणेच आहे.
2009च्या निवडणूकांदरम्यान राहुल गांधी यांच्या प्रचार सभांदरम्यान प्रियंका गांधी सिंपल साड्यांमध्ये दिसून आल्या होत्या. या साड्यांची स्टाइल अगदी तंतोतंत इंदीरा गांधींप्रमाणेच होती. फक्त साड्यांची डिझाइन आणि त्या नेसण्याची पद्धतच नाही तर प्रियंका यांची साडी सावरण्याची पद्धत आणि डोक्यावर पदर घेण्याची स्टाइलही आजी इंदीरा गांधींप्रमाणे होती.
प्रियंका गांधीची साडी स्टाइल
राजकारणामध्ये नेहमीच सिंपल आणि साध्या पेहरावाला पसंती देण्यात येते. त्याचप्रमाणे कधीही एखाद्या महिलेच्या पेहरावावरून किंवा मेकअपवरून तिला गृहित धरता कामा नये. आजी इंदीरा गांधी यांच्याप्रमाणेच प्रियंका गांधी यांनाही सिम्पल एलिगेंट साड्या परिधान करण्याची सवय आहे. बऱ्याचदा प्रियंका एम्ब्रायडरी असणाऱ्या हेव्ही साड्यांपासून स्वतःला लांबच ठेवताना दिसतात.
प्रियंका गांधींचा नो-मेकअप लूक
सिंपल आणि सोबर स्वभाव असणाऱ्या प्रियंका गांधी यांनी नेहमी नो-मेकअप लूक कॅरी केला आहे. यामध्ये काहीच शंका नाही की, मेकअप न करताही प्रियंका यांच्या चेहऱ्यावरील ग्लो कायम असतो. त्यांच्या चेहराही आजी इंदीरा गांधींप्रमाणेच दिसतो. इंदीरा गांधीही शक्यतेवढ्या मेकअपपासून लांब राहत असतं.