तुम्ही कधी रेड व्हेलवेट केके खाल्ला आहे का? थिक सॉफ्ट टेक्शर असणारा हा केक चीझ आयसिंग केलेला असतो. पाहताच क्षणी तोंडाला अगदी पाणी सुटतं. पण तुम्हाला माहीत आहे का? रेड व्हेलवेट केकची क्रेझ पाहून रेड व्हेलवेट कलरचा हेअर कलर फॅशन वर्ल्डमध्ये ट्रेन्ड होत आहे.
रेड व्हेलवेट डेझर्टची वाढती लोकप्रियता पाहून आता रेड व्हेलवेट हेअर कलर मार्केटमध्ये आला आहे. अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये या कलरची क्रेझ वाढत आहे. इंस्टाग्रामवर देखील हा हेअर कलर धुमाकूळ घालत असून #redvelvethair या नावाने ते ट्रेन्ड होत आहे. तुम्हीही हा हेअर कलर ट्राय करून एक नवीन लूक मिळवू शकता.
प्रसिद्ध पॉप सिंगर एरियाना ग्रांडे हिदेखील सध्या हा फॅशन ट्रेन्ड फॉलो करताना दिसून येत आहे. तिच्या केसांवर हा हेअर कलर सूट होत असून ती फार सुंदर दिसत आहे.
फॅशन वर्ल्डमध्ये ट्रेन्ड करणारा हा कलर दिसायला जरी सुंदर दिसत असला तरी तो सगळ्यांना सुट करेल असं नाहीच. त्यामुळे केसांना हा कलर करण्याआधी व्यवस्थित विचार करा. कॉलेज गोईंग स्टुडंट्ससाठी हा कलर योग्य ठरेल पण जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्हा विचारपूर्वक कलरची निवड करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हा हेअर कलर करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुढील तीन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
1. रेड व्हेलवेट कलर सर्वांना आवडतो, परंतु हा हेअर कलर सर्वांनाच सूट करेल असं नाही. हा कलर हटके हेअरस्टाइल आणि केसांच्या लेन्थवरच खुलून दिसतो. जर तुमचे केस स्ट्रेट असतील तर डार्क कलर ठेवा. पण जर तुमचे केस कर्ली असतील तर तुम्ही वॉयलेट किंवा थोडा ऑरेंज शेड ट्राय करू शकता. यामुळे तुमचे केस सुंदर आणि अॅट्रॅक्टिव्ह दिसतील.
2. तुमचा स्किन टोन लक्षात घेऊन कलर शेडची निवड करा. त्यामुळे रेड व्हेलवेट हेअर कलर अप्लाय करण्याआधी एखाद्या हेअर एक्सपर्टचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.
3. सर्व हेअर कलरप्रमाणेच हा कलर मेन्टेन ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. तुम्हाला प्रत्येक 5 ते 6 आठवड्यांसाठी हेअर स्टायलिशकडून केसांना रूट टचअप करणं गरजेचं असतं. असं केल्यामुळेच केसांची चमक आणि कलर शेड सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते.