स्लिट गाउनचा आहे जमाना; तुम्हीही करू शकता ट्राय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:16 PM2019-04-02T15:16:33+5:302019-04-02T15:22:12+5:30
एखाद्या फंक्शनसाठी जाताना अनेक मुलींना प्रश्न पडतो की, कोणते आउटफिट्स वेअर करायचे? अनेक मुलींची अशी इच्छा असते की, असं काहीतरी वेअर कराव ज्यामध्ये स्टनिंग आणि क्लासी लूकसोबतच कम्फर्टनेसही असेल.
एखाद्या फंक्शनसाठी जाताना अनेक मुलींना प्रश्न पडतो की, कोणते आउटफिट्स वेअर करायचे? अनेक मुलींची अशी इच्छा असते की, असं काहीतरी वेअर कराव ज्यामध्ये स्टनिंग आणि क्लासी लूकसोबतच कम्फर्टनेसही असेल. यासाठी सर्वात उत्तम आउटफिट म्हणजे, गाउन.
सध्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही गाउनला प्रेफरंस देताना दिसतात. जर तुम्हीही गाउनला तुमच्या वॉर्डरोबचा भाग बनवण्याच्या विचारात असाल तर बॉलिवूड दिवाजकडून काही टिप्स घेऊ शकता. फॅशन वर्ल्डमध्ये सध्या स्लिट गाउन्सचा ट्रेन्ड आहे. पार्टी ड्रेस म्हणून गाउनला अनेकांची पसंती असते. आता यामध्ये स्लिट असल्यामुळे दिवसेंदिवस याची क्रेज वाढत आहे. हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत सगळीकडे स्लिट गाउनचा ट्रेन्ड पहायला मिळतो.
करीना कपूर खान पासून ते मलायका अरोरा, ईशा गुप्ता, जान्हवी कपूर, सारा अली खान, आलिया भट्ट यांसारख्या अनेक अभिनेत्री स्लिट गाउनसाठी क्रेझी आहेत. अनेक इव्हेंट्समध्ये त्यांनी स्लिट गाउन वेअर करून हजेरी लावली होती. तुम्हीही या सलिब्रिटींना फॉलो करून त्यांच्याकडून स्लिट गाउन वेअर करण्यासाठी टिप्स घेऊ शकता. पण स्लिट गाउन खरेदी करताना काही खास टिप्स लक्षात घेणं गरजेचं असतं. जाणून घेऊया काही टिप्स...
1. स्लिट गाउनसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगली हाइट असणं गरजेचं असतं. उंच मूलींना हे गाउन सुंदर दिसतात. जर तुमची हाइट 5 फुटांपेक्षा कमी असेल तर स्लिट गाउन खरेदी करू शकता. तुम्ही मॅक्सी ड्रस किंवा शॉर्ट ड्रेस ट्राय करू शकता.
2. स्लिट गाउन असाच वेअर करू नका. म्हणजेच, जर तुम्ही त्यामध्ये अजिबात कन्फर्टेबल नसाल तर खरेदी करू नका.
3. स्लिट गाउन खरेदी करताना कलरही लक्षात घ्या. या वातावरणात ब्राइट कलरसोबत कूल कलर्सही तुम्हाला फार हॉट आणि सेक्सी लूक देतात.
4. सध्या फॅशन वर्ल्डमध्ये जिप्सी लूकही ट्रेन्डमध्ये आहे. जर तुम्ही कोणत्या पार्टी किंवा फंक्शनमध्ये काही हटके ट्राय करण्याच्या विचारात असाल तर जिप्सी लूक ट्राय करू शकता.
त्यासाठी तुम्ही एखादा ऑफ शोल्डर फिटेड ड्रस घ्या आणि त्यासोबत एलिगेंट ज्वलरी ट्राय करा. मोठे इयररिंग्स आणि फंकी नेकलेससोबत कॅरी केलं तर आणखी सुंदर दिसाल.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.