Join us

१२ चुंबनदृश्यांवर संस्कारी सेन्सॉर बोर्ड 'बेफिक्रे'

By admin | Published: October 25, 2016 5:22 PM

सेन्सॉरने बोर्डाने १२ चुंबनदृश्ये असलेल्या 'बेफिक्रे'च्या ट्रेलरला 'युए' प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सेन्सॉर बोर्डावर टीका केली केली जात आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २५ -  रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलमधून रणवीर आणि वाणीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. सेन्सॉरने बोर्डाने १२ चुंबनदृश्ये असलेल्या 'बेफिक्रे'च्या ट्रेलरला 'युए' प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सेन्सॉर बोर्डावर टीका केली केली जात आहे. याअगोदर चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते, ज्यामध्ये रणवीर आणि वाणी किस करताना दिसत होते. आदित्य चोप्राने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून ९ डिसेंबरला रीलीज होणार आहे.

 
चित्रपटांमध्ये प्रणयदृश्य किंवा चुंबनदृश्याचा समावेश असल्यास त्यावर सेन्सॉर बोर्डाने आजवर कठोर भूमिकाच घेतल्याचे पाहावयास मिळाले होते. अशी दृश्ये असलेल्या चित्रपटांना सेन्सॉरकडून एकतर कात्री लावली जायची किंवा त्यांना ए प्रमाणपत्र दिले जायचे. पण, १२ चुंबनदृश्यांचा समावेश असलेल्या बेफिक्रे चित्रपटाच्या ट्रेलरला सेन्सॉरने चक्क युए प्रमाणपत्र दिले आहे. 
 
दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने यापुर्वी बार बार देखो चित्रपटात स्त्रियांची अंतर्वस्त्र दाखविण्यात आलेल्या दृश्यास हे आपल्या संस्कृती विरुद्ध असल्याचे सांगत त्यास कात्री लावली होती. तसेच, ऐ दिल है मुश्किलमधील अनुष्का शर्माच्या चुंबनदृश्यावरही आक्षेप घेतला होता. तर वेगवान, थरार आणि सस्पेन्समुळे अतिशय लोकप्रिय ठरणा-या जेम्स बाँड पटातील पुढील चित्रपट 'स्पेक्टर' भारतात येण्यापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील किसींग सिन्स व शिवराळ भाषेला कात्री लावत या चित्रपटाला U/A असे सर्टिफिकेट दिले होते. त्यावेळी  रांगडी भाषा आणि प्रणयदृष्येच कापून टाकल्याने ट्विटरकर चांगलेच निराश झाले होते 'संस्कारी जेम्स बाँड' हा हॅशटॅग ट्रेन्डमध्ये आणून त्या माध्यमातून सेन्सॉर बोर्डाची चांगलीच खिल्ली उडवली होती. मात्र, बेफिक्रेच्या वेळी बहुदा सेन्सॉरची गणितं बदलल्याचे दिसते. त्यामुळे आता सेन्सॉरची नवी बाजू पाहावयास मिळाल्याने काही जणांना मात्र धक्का बसला आहे