12th Fail बॉक्स ऑफिसवर पास! ३२ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 05:10 PM2023-11-29T17:10:54+5:302023-11-29T17:11:16+5:30

12th Fail Box Office : विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित '12th Fail' चित्रपट बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांना काटें की टक्कर देत आहे.

12th Fail box office collection vikrant massey movie crossed 50cr details | 12th Fail बॉक्स ऑफिसवर पास! ३२ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा

12th Fail बॉक्स ऑफिसवर पास! ३२ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत असलेला '12th Fail' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. युपीएससी या स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा संघर्ष प्रवासावर आधारित हा चित्रपट आहे. १२वीत नापास होऊनही स्पर्धा परीक्षांचा लक्षभेद करत IPS अधिकारी झालेल्या मनोज कुमार मिश्रा यांचा प्रवास या चित्रपटातून दाखविण्यात आला आहे. विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित '12th Fail' चित्रपट बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांना काटें की टक्कर देत आहे.

जिकडे तिकडे सर्वत्र '12th Fail' सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. २७ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला हा चित्रपट सहाव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होते. हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करायला सुरुवात केली होती. पहिल्याच आठवड्यात १३ कोटींचा गल्ला या चित्रपटाने जमवला होता. आता '12th Fail' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, २०-२५ कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई करताना दिसत आहे. '12th Fail' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत ५०.६८ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली असून ही हृदयस्पर्शी कहाणी त्यांच्या पसंतीस उतरली आहे. 

'12th Fail' सिनेमात विक्रांत मेसीने IPS अधिकारी मनोज कुमार मिश्रा यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री मेधा शंकर श्रद्धा जोशीच्या भूमिकेत आहे. या सिनेमात संजय बिश्नोई, प्रियांशू चॅटर्जी, हरिश खन्ना या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 
 

Web Title: 12th Fail box office collection vikrant massey movie crossed 50cr details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.