Join us

17 yesars of Koi Mil Gaya : आता बरीच मोठी झाली हृतिक रोशनची बच्चे कंपनी, वाचा कोण कुठे आहेत बिझी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 10:19 AM

हृतिक रोशनच्या गाजलेल्या कोई मिल गया सिनेमाला १७ वर्षे पूर्ण झाली. मात्र, आजही हा सिनेेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मुख्य कलाकारांसोबत यातील बालकलाकारांनीही लोकप्रियता मिळवली होती. पण ते आज करतात? कसे दिसतात? हे आपण बघणार आहोत.

हृतिक रोशनच्या 'कोई मिल गया' या सुपरहिट सिनेमाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. २००३ मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा फार चालणार नाही, अशी चर्चा त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये होती. पण या अनेकांचे अंदाज खोटे ठरवत या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. इतकेच नाही तर त्याचा सीक्वलही आला होता. या सिनेमात हृतिक रोशन आणि प्रीती झिंटासोबतच बालकलाकारांनीही लक्षात राहील असं काम केलं होतं. पण आता १७ वर्षांनंतर ही बच्चे कंपनी काय करत आहे? चला जाणून ते आता काय करताहेत...

हंसिका मोटवानी

''कोई मिल गया'च्या बच्चे कंपनीतील सर्वात जास्त लोकप्रिय ठरली ती हंसिका मोटवानी. ती आज साऊथ इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. हंसिकाची या सिनेमातील भूमिका लोकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर तिने शाका लाका बूम बूम मालिकेतही काम केलं होतं.

अनुज पंडित शर्मा

'कोई मिल गया'तील रोहित मेहराचा पंजाबी मित्र कुणी विसरू शकणार नाही. सिनेमाभर त्याचे फनी डायलॉग प्रेक्षकांना हसवत राहतात. अनुजने साकारलेली ती पंजाबी मुलाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आज अनुज टीव्ही इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. अनेक हिट मालिकांमध्ये तो होता.. त्याने परवरिश आणि जोगीसारख्या मालिकात काम केलंय.

ओमकार पुरोहित

'कोई मिल गया' सिनेमातील बास्केट बॉल मॅच सर्वांनाच आवडते. या मॅचमध्ये ओंकार पुरोहितने महत्वाची भूमिका बजावली होती. तो रोहितच्या टीमचा महत्वाचा सदस्य होता. ओमकार आता मराठी सिनेमात काम करताना दिसतो. २०१८ मध्ये त्याचा जगा वेगळी अंत्ययात्रा हा सिनेमा आला होता. 

प्रणिता बिश्नोई

या सिनेमात दुसरी फीमेल बालकलाकार होती प्रणिता. तिची भूमिका फार मोठी नव्हती. पण तरी ती लक्षात आहे. इतर कलाकारांप्रमाणे ती सिनेमात किंवा मालिकेत दिसली नाही. ती सोशल मीडियावरही फार अॅक्टिव नसते. ती काय करते याबाबतही माहिती नाही. 

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूड