Join us

2 Years Of War: वाणी कपूर म्हणते,'माझ्या करियरमधील सर्वात सुंदर गाणी मिळाल्याबद्दल मी स्वतःला समजते नशीबवान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 19:22 IST

वॉरला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वाणीने हा सिनेमा तिच्या करियरमधला किती खास सिनेमा होते हे सांगितले.  

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरनंवॉर सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली आणि आपल्या अभिनयानं छाप पाडली. सहकलाकार हृतिक रोशनबरोबर ती किती छान दिसली आणि अर्थात घुंगरू गाणं, त्यात तिला भारतीय सिनेमातला नृत्याचा मापदंड स्वतः हृतिकबरोबर नृत्य करायला मिळालं. वॉरला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वाणीनं हा सिनेमा तिच्या करियरमधला किती खास सिनेमा होतं हे सांगितलं.  

वाणी म्हणाली, ‘माझ्या मते, प्रत्येक सिनेमानंतर कलाकाराला त्याचा नवा एक पैलू उमगत असतो. तुम्हाला अनुभव मिळतो, नवी शिकवण मिळते आणि कलाकार म्हणून बऱ्याच गोष्टींचं निरीक्षण करायला मिळतं. त्यातून भविष्यातल्या कामाचा पाया तयार होत असतो. मला असं वाटतं, की आतापर्यंत मला कायमच चांगली गाणी मिळाली, मग ते गुलाबी असो, नशे सी चढ गई असो किंवा घुंगरू असो.’ 

 हृतिकबरोबर काम करायला मिळावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यांची ताजी, टवटवीत जोडी आणि त्याच्यासोबतची विलक्षण केमिस्ट्री तिनं कशी साध्य केली याबद्दल वाणीनं बरंच काही सांगितलं.

ती म्हणाली, ‘तसं म्हटलं गेलं याचा मला आनंद वाटतो. हृतिकचं प्रत्येक कामच जबरस्त असतं, मग तो अभिनय असो किंवा नृत्य. तो स्वतःची पूर्ण जाणीव असणारा, मेहनती आणि बुद्धीमान कलाकार आहे. त्याच्यासोबत काम करायची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. त्याच्यासोबत काम करणं हा माझा सन्मान तसंच माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मला आशा आहे, की पुढच्या वेळी मी अजून जास्त मेहनत करेन आणि कदाचित तो जितकं चांगंल काम करतो, त्याच्या किमान निम्मं बरं काम मला जमेल.’

टॅग्स :वाणी कपूरहृतिक रोशनटायगर श्रॉफवॉर