अक्षय कुमार- रजनीकांत यांच्या ‘2.0’ या चित्रपटाने प्रेक्षकांना जणू वेड लावले आहे. बॉक्स ऑफिसवरचे या चित्रपटाच्या कमाईचे आकडे याचा पुरावा आहे. होय, गत २९ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. रिलीजनंतरच्या दोन आठवड्यांत ‘2.0’ने ७०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. ७०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा ‘2.0’ हा कॉलिवूडच्या इतिहासातील पहिला चित्रपट आहे. ट्रेड अॅनालिस्ट मनोबल विजयबालन यांनी दिलेल्या आकड्यानुसार, ‘2.0’ने आत्तापर्यंत जगभरात ७१०.९८ कोटी रूपयांची कमाई केली आहे. केवळ तामिळनाडूत या सिनेमाने १६६. ९८ कोटींचा गल्ला जमवला आहे.
अक्षय-रजनीच्या ‘2.0’ची ७०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 15:11 IST
होय, गत २९ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
अक्षय-रजनीच्या ‘2.0’ची ७०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!
ठळक मुद्दे ७०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा ‘2.0’ हा कॉलिवूडच्या इतिहासातील पहिला चित्रपट आहे. ट्रेड अॅनालिस्ट मनोबल विजयबालन यांनी दिलेल्या आकड्यानुसार, ‘2.0’ने आत्तापर्यंत जगभरात ७१०.९८ कोटी रूपयांची कमाई केली आहे.