सुपरस्टार रजनीकांत व अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा चित्रपट उद्या गुरुवारी प्रदर्शित होतोय. एकीकडे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण दुसरीकडे टेलिकॉम कंपन्या या चित्रपटावर नाराज आहेत. होय, आत्तापर्यंत रिलीज झालेला या चित्रपटाचा टीजर, ट्रेलर व अन्य व्हिडिओ पाहून सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाने या ‘2.0’च्या मेकर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे. गत २३ नोव्हेंबरला सेन्सॉर बोर्ड आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या तक्रारीत ‘2.0’च्या ट्रेलर व टीजरचे पुनर्परीक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या चित्रपटात मोबाईल आणि टेलिकॉमशी संबंधित वस्तूंना नकारात्मकरित्या दाखवण्यात आल्याचा असोसिएशनचा आक्षेप आहे.
2.0 Movie Controversy: प्रदर्शनाच्या तोंडावर ‘2.0’ वादात! टेलिकॉम कंपन्यांनी केली प्रदर्शन रोखण्याची मागणी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 10:33 IST
सुपरस्टार रजनीकांत व अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा चित्रपट उद्या गुरुवारी प्रदर्शित होतोय. एकीकडे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण दुसरीकडे टेलिकॉम कंपन्या या चित्रपटावर नाराज आहेत.
2.0 Movie Controversy: प्रदर्शनाच्या तोंडावर ‘2.0’ वादात! टेलिकॉम कंपन्यांनी केली प्रदर्शन रोखण्याची मागणी!!
ठळक मुद्देहोय, आत्तापर्यंत रिलीज झालेला या चित्रपटाचा टीजर, ट्रेलर व अन्य व्हिडिओ पाहून सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाने या ‘2.0’च्या मेकर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे.‘2.0’मध्ये ज्याप्रकारे मोबाईल सर्व्हिस व टॉवर्सला दाखवण्यात आले आहे, ते संपूर्णत: निराधार,चुकीचे व काल्पनिक आहे. हे सगळे टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे, असा ठपका असोसिएशनने आपल्या तक्रारीत ठेवला आहे.