Join us

2016 : हे सेलिब्रिटी बनले पालक

By admin | Published: December 24, 2016 12:00 AM

फवाद खान - पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या पत्नीने ऑक्टोबरमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याचे हे दुसरे अपत्य असून ...

फवाद खान - पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या पत्नीने ऑक्टोबरमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याचे हे दुसरे अपत्य असून एलिना असे त्याने त्याच्या नन्ही परीचे नाव ठेवले आहे. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात काम करणा-या पाकिस्तानी कलाकारांवरून वाद निर्माण झाला होता. करण जोहरच्या ए दिल है मुश्किल चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणारा फवादही वादात सापडला होता.

अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया डिसोझाने 2012मध्ये लग्न केले. 2014मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला आणि तर २०१६ च्या जून महिन्यात जेनेलियाने त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला.

तुषार कपूरला मुलगा झाला ही बातमी ऐकून खरे तर सगळ्यांना धक्का बसला होता. पण त्याला मुलगा सरोगसीच्या मदतीने झाला हे त्याने पत्रकार परिषद घेऊन मीडियाला सांगितले होते.

शाहिद कपूर आणि करिना कपूरचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. पण काही काळानंतर त्यांनी ब्रेकअप केले आणि शाहिदने मीरासोबत लग्न केले. मीरा आणि शाहिदला 26 ऑगस्टला मुलगी झाली. शाहिद आणि मीरा या दोघांच्या नावावरून तिचे नाव मिशा ठेवण्यात आले आहे.

सैफ अली खान आणि करिनाच्या घरात नुकताच एक नवीन पाहुणा आला असून त्याच्या स्वागातासाठी घरात सध्या जय्यत तयारी सुरू आहे. २० डिसेंबर रोजी करिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. यावर्षी पालक बनणारे करिना आणि सैफ हे पहिले सेलिब्रेटी नाहीत तर अनेक सेलिब्रेटींच्या घरात या वर्षी बाळाचे आगमन झाले आहे. कोण आहेत हे सेलिब्रेटी यावर नजर टाकूया...