Join us  

2017 ऑस्कर सोहळा : मूनलाईट ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

By admin | Published: February 27, 2017 7:34 AM

८९ व्या ऑस्कर सोहळ्यात ' मूनलाईट' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. २७ -  ८९ व्या ऑस्कर सोहळ्यात ' मूनलाईट' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासह ' ला ला लॅण्ड'ने ८९व्या ऑस्कर सोहळ्यात 6 पुरस्कार पटकावले. या चित्रपटातील भूमिकेसाठी एमा स्टोनला प्रथमच ' सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा' पुरस्कार मिळाला. 
याशिवाय चित्रपटातील ' सिटी ऑफ स्टार्स' गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरजिनल साँग, ओरिजनल स्कोर, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी. सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन या विभागातही पुरस्कार मिळाले. 
 
अॅण्ड दी ऑस्कर गोज टू…हे चिरपरिचीत शब्द ऐकायला मिळणे हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. हृदयाचा ठोका चुकायला लावणा-या, हॉलिवूडमधील मानाच्या समजल्या जाणा-या ' 2017 ऑस्कर' पुरस्कार सोहळ्याला सुरूवात झाली. यंदाचे हे पुरस्कार सोहळ्याचे ८९ वे वर्ष होते. कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये सुरू असलेल्या या कार्यक्रमाला हॉलिवूडसह बॉलिवूड ता-यांचीही मांदियाळी जमली. गेल्या वर्षी प्रमाणेच बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा यंदाही सोहळ्यास उपस्थित असून पांढ-या रंगाच्या गाउनमध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या प्रियांकाचे सौंदर्य खुलून दिसत होते.
 
दरम्यान, सुप्रसिद्ध टेलिव्हीजन अँकर जिमी किमेल यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करत आहे. आपल्या कोपरखळ्यांनी उपस्थितांना पोटभरून हसवणा-या जिमीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवरून डिवचले. . नेहमी ट्विटरवर नको तेवढे सक्रिय असणारे ट्रम्प आज कुठे आहेत, असा टोमणा सोहळ्यात मारताना ‘अध्यक्ष महोदय जागे आहात का?’, असा सवाल करणारे ट्विट जिमीने केले.. 'ला ला लॅण्ड’, ‘मूनलाइट’, ‘फेन्स’, ‘लायन’, ‘अरायव्हल’, ‘मँचेस्टर बाय द सी’, ‘हेल ऑर हाय वॉटर’, ‘हिडन फिगर्स’, ‘हॅकसॉ रिज’ या चित्रपटांमध्ये ऑस्करसाठी चुरस होती. 
 
 
Live अपडेट्स : 
 
- मूनलाईट ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट. 
- 'ला ला लॅण्ड'साठी डेमियन शेझलला मिळाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार
 
- केसी अॅफ्लेक ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता. 'मँचेस्टर बाय दि सी' चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला पुरस्कार.
 
- ला ला लँड चित्रपटातील भूमिकेसाठी एमा स्टोनला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार.
 
 
-  ‘मूनलाइट’ चित्रपटातील भूमिकेसाठी  मेहर्शाला अली याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार
 
- ' फेन्सेस' चित्रपटातील अभिनयासाठी व्हायोला डेव्हिसने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.
 
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईनसाठी 'ला ला लॅण्ड'ला पुरस्कार 
 
- सुसाईड स्क्वाड'च्या टीमला सर्वोत्कृष्ट मेकअपसाठी पुरस्कार जाहीर.
 
- 'हॅक्सॉ रिज'ला सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंगचा ऑस्कर
 
- 'फॅन्टॅस्टिक बिट' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार म्हणून कॉलिन एटवूडला पुरस्कार.
 
- 'ओजे मेड इन अमेरिका’ला ठरली सर्वोत्कृष्ट डॉक्युमेण्ट्री फिचर.
 
 - 'पायपर' ठरली सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला 'झुटोपिया'ला.
 
- 'द सेल्समन'ला सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा चित्रपटाचा पुरस्कार. 
 
- सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार ' सिंग'ला प्रदान
 
- सर्वोत्कृष्ट ‘डॉक्युमेण्ट्री शॉर्ट सब्जेक्ट’चा पुरस्कार ‘द व्हाइट हेल्मेट्स’ला.
 
- सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार 'द जंगल बुक' सिनेमाला.
 
 
 
सर्वोत्कृष्ट अभिनेता मेहर्शाला अली
 
 
 
देसी गर्ल प्रियांका चोप्रा
 
 
 सुसाईड स्क्वाड'च्या टीमला सर्वोत्कृष्ट मेकअपसाठी पुरस्कार
 
 

 

'ओजे मेड इन अमेरिका’ ठरली सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर.

 

सर्वाधिक नामांकन मिळवणा-या ‘ला ला लॅण्ड’ चित्रपटातील अभिनेत्री एमा स्टोन

{{{{twitter_post_id####}}}}