Join us

सुनैना रोशन सांगतेय वडिलांनी माझ्या कानाखाली मारली, हृतिक देखील करत नाहीये कोणतीही मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 2:12 PM

हृतिक रोशनची बहीण सुनैनाला तिच्या घरातील कोणीच समजून घेत नसल्याचे तिचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देरूहैल अमिन या मुस्लीम मुलासोबत माझे प्रेमसंबंध आहेत, हे कळल्यावर माझ्या वडिलांनी माझ्या कानाखाली वाजवली होती. माझा भाऊ हृतिक देखील त्यांच्याच बाजूने आहे. मी दुसरीकडे राहायला जायचे ठरवले होते. पण हृतिकने मला भाड्याच्या पैशांसाठी मदत करायला नकार दिला.

हृतिकची बहीण सुनैनाने गेल्या आठवड्यात एक ट्वीट केले होते. या ट्वीटवरून तिच्या आयुष्यात काहीतरी समस्या असल्याचे दिसून येत होते. याविषयी तिला पिंकव्हिलाने विचारले असता तिने सांगितले होते की, माझ्या कुटुंबामध्ये आणि माझ्यात काही तणाव आहेत. पण त्याच्याबद्दल मला बोलायचे नाहीये. मी काही दिवस दुसरीकडे देखील राहात होते. पण आता मी माझ्या आईवडिलांच्या घरी आले आहे. पण माझ्यासाठी घराचे प्रवेशद्वार वेगळे असून घरातील एक वेगळा फ्लोअर मला राहाण्यासाठी देण्यात आला आहे. हे खरे तर खूप वाईट आहे. पण माझ्या कुटुंबातील कोणीच माझ्याशी बोलत नाही की मला पाठिंबा देत नाही. 

 

कंगना रणौतची बहीण रंगोलीने नुकतेच एक ट्वीट केले होते आणि त्यात म्हटले होते की, सुनैनाचे एका मुस्लिम मुलावर प्रेम असून या नात्याला तिच्या घरातील मंडळी विरोध करत आहेत. आता सुनैनाने रंगोलीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्याचे एका मुलाखतीत कबूल केले आहे. 

 

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सुनैनाने म्हटले आहे की, रूहैल अमिन या मुस्लीम मुलासोबत माझे प्रेमसंबंध आहेत, हे कळल्यावर माझ्या वडिलांनी माझ्या कानाखाली वाजवली होती. मी त्याच्या संपर्कात राहायचे नाही की, त्याला भेटायचे नाही अशी ताकीद दिली होती. माझा भाऊ हृतिक देखील त्यांच्याच बाजूने आहे. मी माझ्या पालकांचे घर सोडून दुसरीकडे राहायला जायचे ठरवले होते. पण हृतिकने मला भाड्याच्या पैशांसाठी मदत करायला नकार दिला. माझ्या वडिलांची प्रत्येक गोष्ट हृतिक ऐकतो. 

 

माझ्या आणि रुहैलच्या नात्याला कोणीच पाठिंबा देत नाहीये. मला मुंबईत कधी घर घ्यायचे असेल तेव्हा मी तुला मदत करेन असे हृतिकने मला सांगितले होते. मी आता लोखंडवालामध्ये एक भाड्यावर घर शोधले आहे. मी हृतिककडे त्यासाठी मदत मागितली असता अडीज लाख ही रक्कम खूपच जास्त असल्याचे त्याने मला सांगितले. त्याच्यासाठी ही रक्कम खरंच इतकी मोठी आहे का? माझ्या घरातील सगळेच मला खूप त्रास देत आहेत.

दोन दिवसांपूर्वी मी माझ्या पालकांकडे खर्चासाठी पैसे मागितले होते. पण त्यांनी सुरुवातीला पैसे द्यायला नकार दिला. आता त्यांनी मला केवळ ५० हजार रुपये दिले आहेत. त्या पैशातच संपूर्ण महिन्याचा खर्च भागवायचा असे सांगितले आहे. मी त्यांची मुलगी असताना मला इतके कमी पैसे का दिले जात आहेत. मी रोशन कुटुंबातील असल्याने माझा पैशांवर अधिकार नाहीये का? 

टॅग्स :हृतिक रोशनराकेश रोशनकंगना राणौत