मागील ५० ते ७० वर्षांदरम्यान रंगभूमीची गरज विशेषत्त्वाने जाणवली तशी आजही रंगभूमी महत्त्वाचीच आहे. शब्द, डोळे, हात आणि शरीराच्या माध्यमातून थेट संवाद केवळ रंगभूमीद्वारेच साधता येतो. लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवण्यासाठी रंगभूमीला अन्य कोणत्याही माध्यमाची गरज भासत नाही, हेच तिचे श्रेष्ठत्व आहे.
रंगभूमी स्वत:च प्रकाशाचे मूळ तत्त्व आहे आणि तिचा संबंध सर्व दिशांशी दृढ आहे. आपल्याला सर्व प्रकारच्या रंगभूमीची गरज आहे. कारण, रंगभूमी परिवर्तनशील आहे व त्यामुळेच अन्य सर्व माध्यमांच्या तुलनेत रंगभूमीने आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. आजच्या घडीला जगासमोरील आव्हाने रंगभूमीच ताकदीने मांडू शकते....
जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास
१९६१ साली युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने जागतिक रंगभूमी दिनाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ साली साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्यजगतातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी कुणीही एकजण दरवर्षी संदेश देतो. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. पहिल्या वर्षी १९६२ साली पहिला संदेश देणारी व्यक्ती म्हणजे ज्यो कॉक्चू होते.
जीव तोडून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या ......
मन ओतून काम करणाऱ्या .....
तमाम .......पडद्यावरील तसेच पडद्यामागील सर्व कलाकारांना आणि त्यांना टाळ्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन ...उत्साह... दाद.... आणि प्रेरणा ....देणारे मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!