अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने सध्या त्यांच्या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहेत. त्यांचा बाई पण भारी देवा हा बॉक्स ऑफिसवर चांगला गाजतो आहे. ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. या सिनेमामुळे सुकन्या यांचीही बरीच चर्चा होतेय. चित्रपटात त्यांनी मंगळागौरीचा खेळ सुद्धा खेळलाय.पण हे सगळं सुकन्या यांच्यासाठी सोपं नव्हतं. सुकन्या यांनी आजवर खूपच भयानक अशा आजार आणि प्रसंगावर मात केली आहे. लोकमत फिल्मीशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं.
अगदी कमी वयातच त्यांचे भयंकर अपघात झाले होते. आणि तेही शूटिंग सुरू असताना. ‘जन्मगाठ’ या नाटकाचा प्रयोग दरम्यान एक प्रसंगात त्यांना आकडी येऊन पडण्याचा सिन होता, मात्र चुकामुक झाली आणि सहकलाकारांनी त्यांना पडताना सावरायला विसरल्या आणि सुकन्या धडक खाली कोसळल्या. सुकन्या यांना जबर मार बस होता. ज्याची जाणीव त्यांना अपघाताचा दुसऱ्या दिवशी झाली. डोक्यावर मार बसल्याने सुकन्या यांची दृष्टी गेली होती, सुकन्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढचे ४ दिवस त्यांची दृष्टी गेली होती, त्यांना ऐकू येणे, बंद झाले होते.अनेक शस्त्रक्रियेनंतर सुकन्या यांची दृष्टी हळू हळू सुधारली मात्र,अंधुक दृष्टी त्यांच्यासोबत कायम राहिली.
या घटनेमुळे त्या मानसिकदृष्ट्या खचल्या नसल्या तरी त्यांना नृत्य बंद करावे लागले. त्यांनी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तर यानंतर पुन्हा एकदा आयुष्य ट्रॅकवर येत असतानाच १० जून १९९३ फिल्मसिटीमध्ये मृत्युंजय नावाचा मालिकेचं शूटिंग चालू होत. अचानक वर सुटला वादळ आल आणि सेटवरील खांब सुकन्या यांचा पोटावर पडल्या. यावेळी सुकन्या यांचा शरीराची उजवी बाजू पॅरॅलिसिस झाली. त्या वेळेस त्यांची वाचा गेली, सतत सहा महिने त्यांना बोलता आले नाही. पुढच वर्षभर त्यांना अनेक आजारपणांनी ग्रासले यादरम्यान अभिनयाला रामराम करण्याचा विचारही सुकन्या यांचा मनात आला. पण त्यातूनही खचून न जाता त्यांनी धीराने व संयमाने एक वर्षाच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर महेश भट यांच्या दूरदर्शन वरील ‘जमीन आसमान’ या मालिकांमधून काम करण्यास सुरुवात केली. तर आता आलेल्या बाईपण भारी देवा चित्रपट ही त्यांनी कमाल केली. त्यांनी या सिनेमात चक्क मंगळागौर सुद्धा केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या माझ्या जिद्दीच्या जोरावर आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मी हे करु शकले. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हालाच झटावं लागतं.