Join us

कोण आहे जिजाच्या close... बाबा की आजोबा? Kothare कुटुंबातील 3 पिढ्या एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 11:57 IST

आजोबांच्या मांडीवर बसलेली जीजा व्हिडीओत एन्जॉय करताना दिसतेय.

महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी एक अभिनेता, दिग्दर्शक म्हणून मराठीमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलगा आदिनाथने देखील अभिनयसृष्टीत नाव कमावले आहे. आदिनाथ कोठारे, महेश कोठारे आणि जीजाचा एका स्पेशल व्हिडीओ लोकमतसाठी तयार केला आहे. हा व्हिडीओ आदिनाथनाने फादर्स डे निमित्त तयार केला. महेश कोठारे यांच्या तीन पिढ्या या व्हिडीओत दिसतायेत. बाप-लेकाचं अनोख्य बॉन्डिग या व्हिडीओमध्ये दिसतेय. आपल्या आजोबांच्या मांडीवर बसलेली जीजा व्हिडीओत एन्जॉय करताना दिसतेय.जीजा ही आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कोठारे यांची कन्या आहे. गप्पांची मफैल या व्हिडीओत रंगली आहे. आदिनाथची बरीच सीक्रेट्स वडील महेश कोठारे यांना माहित असल्याची कबुली तो या व्हिडीओत देतोय.  कोठारेंचे तीन पिढ्या एकत्र असलेला हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. जीजाचे वडील आदिनाथ कोठारे आणि आजोबा महेश कोठारेंसोबतचे स्पेशल बॉन्डिग या व्हिडीओत दिसतेय. जीजा आजोबा आणि बाबा दोघांच्या क्लोज असल्याचे या व्हिडीओत दिसतेय. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, आदिनाथ कबीर खानच्या 83मध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. एप्रिलमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र लॉकडाऊनमुळे तो अडकला आहे. 

टॅग्स :आदिनाथ कोठारे