महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचा सुपरहिट ठरलेला चित्रपट सडक (Sadak) हा २० डिसेंबर १९९१ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात महेश भट्ट यांनी संजय दत्त (Sanjay Dutt) याच्यासोबत आपली मुलगी पूजा भट्ट (Pooja Bhatt) हीला कास्ट केलं होतं. या रोमॅन्टिक थ्रिलर चित्रपटात दीपक तिजोरी (Deepak Tijori), सदाशिव अमरापुरकर (Sadashiv Amrapurkar), निलिमा अझीम (Neelima Azeem) यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनीही भूमिका साकारल्या होत्या.
स्टारकास्टशिवाय हा चित्रपट हिट ठरण्यात या चित्रपटातील गाण्यांचाही मोठा वाटा होता. नदीम-श्रवण या जोडीनं या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली होती. या चित्रपटाला आता ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं या चित्रपटाबाबतचा एक किस्सा पाहू.
महेश भट्ट यांनी पूजा भट्टला दिला सल्ला१९९१ मध्ये प्रदर्शित झालेला सडक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. असं पाहिलं तर महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांच्याबद्दल अनेक किस्से आपण यापूर्वीही ऐकले असती. एक असाच किस्सा पूजा भट्टनं सडक बाबतीत बोलताना सांगितला होता. त्यावेळी संजय दत्त याचाच जलवा होता. केवळ फॅन्सच नाही, तर बॉलिवूडमधल्या अनेकांची तो पसंत होता. आपल्यासाठी तो एक आयकॉन होता असं पूजा भट्टनं बोलाताना सांगितलं होतं. दरम्यान सडकमध्ये मुख्य भूमिकेत संजय दत्त आणि पूजा भट्ट होते. परंतु त्या चित्रपटात असलेल्या एका किस सीनविषयी आपण नर्व्हस होतो, असं तिनं म्हटलं होतं. ज्या व्यक्तीचे पोस्टर्स आपल्या रुममध्ये लावलेले आहेत, अशा व्यक्तीला आपण किस करणार आहोत हा विचार डोक्यात होता. त्यावेळी वडील महेश भट्ट यांनी दिलेला सल्ला आपल्याला कायम आठवणीत राहिला असंही तिनं म्हटलं होतं.
"चित्रपटात काम करताना कायम तुम्ही निरागसतेची काळजी घ्या. जर तुला ते व्हल्गर जाणवलं तर तुला ते व्हल्गरच वाटेल. यामुळेच किसिंग सीन, लव्ह मेकिंग सीन निरागसतेने आणि ग्रेसफुल पद्धतीनं करावे लागतील. जे आपल्याला यातून दाखवायचं आहे, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. वडिलांनी दिलेला हा सल्ला कायमच आठवणीत राहीला," असं ती म्हणाली.