Join us

पहिला पगार ते पहिली गर्लफ्रेंड..! मुक्ता बर्वेमुळे उमेश कामतची अनेक गुपितं झाली उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 4:33 PM

35 Qustions with Umesh Kamat : ‘अजुनही बरसात आहे’च्या निमित्तानं मुक्तानं घेतली उमेशची छोटीशी पण मजेशीर मुलाखत...

ठळक मुद्दे‘अजुनही बरसात आहे’ या मालिकेबद्दल सांगायचं तर, जुलैमध्ये सुरू झालेली ही मालिका सध्या एका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

उमेश कामत (Umesh Kamat) या आपल्या आवडत्या मराठमोळ्या हिरोबद्दल माहित करून घेणं कुणाला आवडणार नाही. अगदी मित्र त्याला पे्रमानं काय हाक मारतात इथपासून तर त्याच्या पहिल्या गर्लफ्रेन्डबद्दल. चला तर, तुमच्या मनातील 35 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. होय, मुक्ता बर्वे (Mukta Barve) प्रश्न विचारणार आणि उमेश त्याची अगदी प्रामाणिक उत्तरं देणार.सध्या उमेश व मुक्ताची ‘अजुनही बरसात आहे’ (Ajunahi Barasat Aahe) ही मालिका चांगलीच गाजतेय. याच मालिकेच्या निमित्तानं ‘अजुनही बरसात आहे’ सेटवर मुक्तानं उमेशची छोटीशी पण मजेशीर मुलाखत घेतली. या मुलाखतीचा व्हिडीओ सोनी मराठीनं आपल्या इन्स्टापेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

 तुझा आवडता रंग कोणता? असा पहिला प्रश्न मुक्ता उमेशला विचारते. यावर जो फिका पडत नाही तो..., असं झक्कास उत्तर उमेश देतो. कोणत्या वर्षी दहावी झालास? यावर 1996 असं उत्तर उमेश देतो. पण नंतर मी चुकलोय, असं सांगून खो-खो हसत सुटतो. आवडती डिश विचारल्यावर, भेलपुरी, पाणीपुरी असं तो सांगतो. कसली भीती वाटते? तर उंचीची असं उत्तर तो देतो. पहिली कमाई किती होती, तर 50 रूपये, तुझी पहिली गर्लफ्रेन्ड कधी होती? पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना, असं उमेश सांगतो. पुढे पुढे ही मुलाखत अशा छोट्या छोट्या प्रश्नांसह मस्तपैकी रंगत जाते. यासाठी तुम्हाला सोबत दिलेला हा व्हिडीओ बघावा लागेल.

‘अजुनही बरसात आहे’ या मालिकेबद्दल सांगायचं तर, जुलैमध्ये सुरू झालेली ही मालिका सध्या एका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मुक्ता आणि उमेशची जोडी अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेच्या निमित्तानं उमेशनं 8 वर्षानंतर टीव्हीवर पुनरागमन झालंय. 8 वर्ष सतत मालिकांमध्ये काम करण्यास नकार दिल्यावर त्यानं ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका स्वीकारली. याचं कारण म्हणजे, यात त्याला हवं होतं तसं पात्र, हवी तशी भूमिका मिळाली. शिवाय मुक्ता बर्वेसोबत काम करण्याची संधीही मिळाली. 

टॅग्स :उमेश कामतमुक्ता बर्वे