आजवर एका आठवड्यात एक, दोन किंवा फार फार तर तीन मराठी चित्रपट झाले आहेत. पण, या आठवडयात मराठी चित्रपटात फुल आॅन जोशात आहे बरं. या आठवड्यात तब्बल ५ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहेत. ‘धनगरवाडा’, ‘महानायक’, ‘शाली’, ‘शिनमा’ आणि ‘उर्फी’ हे ते ५ चित्रपट आहेत. ‘धनगरवाडा’ हा चित्रपट समीर आठल्ये यांनी दिग्दर्शित केला असून, मेंढपाळ समाजातील लोकांवर हा चित्रपट भाष्य करतो. ‘महानायक’ हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट असून, चिन्मय मांडलेकर वसंतराव नाईकांच्या मुख्य भूमिकेत आहेत. ‘शाली’ हा चित्रपट अतुल साटम यांनी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘शिनमा’ हा चित्रपट मिलिंद कवडे यांनी दिग्दर्शित केला असून, अजिंक्य देव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, विजय पाटकर, किशोरी शहाणे, निशा परुळेकर, गणेश आचार्य अशी दिग्गज कलाकार मंडळी चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. तर, टाईमपास फेम प्रथमेश परब आणि मिताली मयेकर यांचा उर्फी चित्रपटही आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट विक्रम प्रधान यांनी दिग्दर्शित केला आहे.
शुक्रवारी ५ मराठी चित्रपटांचा धमाका
By admin | Published: November 26, 2015 1:58 AM