बॉलिवूड आणि वाद या दोन समांतर गोष्टी आहेत. आज एखादा अभिनेता वाद ओढवून घेतो, उद्या एखादी अभिनेत्री किंवा मग एखादा चित्रपटचं वादग्रस्त ठरतो. ऋषी कपूर हे वाद ओढवून घेणारे अभिनेते म्हणून अधिक ओळखले जातात. आपल्या परखड बोलण्यामुळे त्यांनी अनेकदा स्वत:हून वाद ओढवून घेतले. अनेक वादग्रस्त ट्विस्टमुळे त्यांना ट्रोलर्सच्या नाराजीचा सामना करावा लागला. अर्थात याऊपरही ऋषी कपूर सगळ्यांना पुरून उरलेत. आज जाणून घेऊ यात, त्यांची वादळ निर्माण करणारी पाच वादग्रस्त वक्तव्ये...
ऋषी कपूर केवळ देशातील मुद्यांवरचं आपले मत मांडत नाहीत तर त्यांच्या इंडस्ट्रीवरून त्यांनी अनेकदा हल्लाबोल केला आहे. फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक लोक आहेत ज्यांना अॅक्टिंगमधला अ की ढ येत नाही. असे अनेक अॅक्टर्स मी पाहतो. अॅक्टिंगसाठी भीक मागणे आणि शिफारसींच्या जोरावर चित्रपटांत काम मिळवणे हे सगळे चुकीचे आहे. एका चांगल्या अॅक्टरला चांगली अॅक्टिंग यायलाच हवी, असे ते एका मुलाखतीत म्हणाले होते.
ऋषी कपूर यांना बीफ खाण्यावरूनही विरोध टीका सहन करावी लागली आहे. वर्षभरापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना होय, मी बीफ खाल्लेयं, अशी जाहीर कबुली त्यांनी दिली होती, यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झंडे दाखवत, या विधानासाठी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.
काश्मिर मुद्यावर बोलताना त्यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या एका वक्तव्यावर ट्विट केले होते. ‘फारख अब्दुल्लाजी सलाम, मी तुमच्या मताशी सहमत आहे. जम्मू-काश्मीर आपला आहे आणि पीओके त्यांचा. भारत-पाक कितीही युद्ध करतो,केवळ याच मार्गाने काश्मीर समस्या सुटू शकते, ’ असे ट्विट त्यांनी केले होते़ त्यांच्या या ट्विटविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.