Join us  

६३वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

By admin | Published: May 05, 2016 12:00 AM

६३वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यास बच्चन परिवाराने हजोरी लावली होतीसर्वोत्कृष्ट बाल कलाकार : गौरव मेनन (बेन)सर्वोत्कृष्ट सहायक ...

६३वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यास बच्चन परिवाराने हजोरी लावली होती

सर्वोत्कृष्ट बाल कलाकार : गौरव मेनन (बेन)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : तन्वी आझमी (बाजीराव मस्तानी)

कबीर खान - गौरव मेनन

मनोज कुमार पुरस्कार घेण्याण्यासाठी स्टेजवर येताना

सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारित) - विशाल भारद्वाज (तलवार)

सर्वोत्कृष्ट मनोरंजन वर्गात ‘बजरंगी भाईजान’ ने पुरस्कार मिळविला.

संजय लीला भन्साळी यांनी ‘बाजीराव मस्तानी’ या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवरील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. सुवर्ण कमळ प्रमाणपत्र आणि रोख अडीच लाख रुपये असा हा पुरस्कार आहे.

मनोज कुमार यांना सुवर्ण कमळ व रोख दहा लाख रुपये असा चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च व मानाचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला

‘तनु वेड्स मनु रिटर्न’ चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना रानावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. रजत कमळ व ५० हजार रुपये रोख असे त्याचे स्वरुप आहे. यापूर्वी कंगनाने ‘फॅशन’ आणि ‘क्वीन’ चित्रपटातील भूमिकांसाठी हा पुरस्कार मिळविला होता.

अमिताभ बच्चन यांना ‘पिकू’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. रजत कमळ व ५० हजार रुपये रोख असा हा पुरस्कार आहे. यापूर्वी बच्चन यांनी १९९० (अग्निपथ) २००५ (ब्लॅक) आणि २००९ मध्ये (पा) हा पुरस्कार मिळविला होता

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ६३ व्या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण झाले.