आज दिल्लीत रंगलेल्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात (67th National Film Awards) साऊथचे मेगास्टार शिवाजीराव गायकवाड अर्थात रजनीकांत (Rajinikanth) यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) गौरविण्यात आले. अभिनेत्री कंगना राणौत व अभिनेता मनोज वाजपेयी यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याच्या पुरस्कांराने सन्मानित करण्यात आले.यावर्षी 22 मार्चला या पुरस्कारांची घोषणा झाली होती. मात्र कोरोनामुळे या पुरस्काराचे वितरण करता आले नव्हते. आज हा पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला.उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते रजनीकांत यांना भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रेक्षकांमध्ये रजनीकांत यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते.
कंगना राणौतला ‘मणिकर्णिका’ व ‘पंगा’ या दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. कंगनाचा हा चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे. यापूर्वी तिला फॅशन, क्वीन, तनु वेड्स मनु रिटर्न्स या सिनेमांसाठी पुरस्कार मिळाला आहे.अभिनेता मनोज वाजपेयी आणि साऊथ सुपरस्टार धनुष यांना विभागून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.‘भोसले’ चित्रपटासाठी मनोज वाजपेयीला हा पुरस्कार मिळाला. तर ‘असूरन’तामिळ चित्रपटासाठी धनुषला या पुरस्काराने गौरवण्यात आले.सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाच्या श्रेणीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) - मनोज बाजपेयी (भोसले), धनुष (असूरन) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना राणौत (पंगा, मणिकर्णिका) सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे
सर्वोत्कृष्ट चित्रपट- MARAKKAR ARABIKKADALINTE SIMHAM (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विजय सेतुपती (सुपर डिलक्स) सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) - सोहिनी चट्टोपाध्याय
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - सावनी रविंद्र (रान पेटलं - Bardo)सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- महर्षी नर्गिस दत्त बेस्ट फिचर फिल्म पुरस्कार - TAJMALसामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- आनंदी गोपाळ सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट - कस्तूरी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- BAHATTAR HOORAIN (हिंदी) सर्वोत्कृष्ट छायांकन - जल्लीकट्टू (मल्याळम)