Join us

7 वर्षांचा संसार मोडला, अभिनेत्याने गुपचूप उरकलं दुसरं लग्न, स्वतःचा धर्मही बदलला, मुलीच्या जन्मानंतर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 14:37 IST

कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात.

Vivian Dsena On Her Marriage-Baby: ‘'मधुबाला' फेम अभिनेता विवियन डिसेना सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आधी त्याने गुपचूप दुसरं लग्न उरकून चाहत्यांना धक्का दिला होता आणि आता अभिनेता बाबा झाल्याची बातमी समोर आली आहे. विवियनने पहिल्यांदाच पत्नी आणि मुलीबाबत मौन सोडले आहे.

'प्यार की एक कहानी', 'शक्ती', 'कसम से' आणि 'मधुबाला' यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केलेल्या विवियन डिसेनाने बॉम्बे टाईम्सशी बोलताना त्याच्या दुसऱ्या लग्नाची कबुली दिली आणि सांगितले की चार महिन्यांपूर्वी तो बाबासुद्धा झाला  आहे. अभिनेता म्हणाला, “होय, मी विवाहित आहे आणि चार महिन्यांच्या मुलीचा बाप आहे. यात कोणती मोठी गोष्ट आहे? जेव्हा मला वाटेल की ती योग्य वेळ आहे तेव्हा मी माझ्या लग्नाची आणि मुलीच्या आगमनाची घोषणा करेन. मी एक वर्षापूर्वी इजिप्तमध्ये एका खाजगी समारंभात नौरान अलीशी लग्न केले.

“वडील होणं हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण होण्यासारखंच आहे. जेव्हा मी माझ्या मुलीला उचलून घेतो तेव्हा मी सर्वाधिक खूश असतो”. विवियनने त्याच्या मुलीचं नाव लेन ठेवलं आहे. त्याला त्याच्या कुटुंबियांना प्रसिद्धीपासून दूर ठेवायचं आहे. म्हणूनच त्याने त्याचं लग्नही सिक्रेटच ठेवलं. 

विवियन  डिसेनाने खुलासा केला की, त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. 2019 मध्ये त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. विवियन म्हणाला, “माझ्या आयुष्यात काहीही बदलले नाही. मी ख्रिश्चन जन्माला आलो आणि आता मी इस्लामचे पालन करतो. मी 2019 मध्ये रमजान महिन्यात इस्लामचे पालन करण्यास सुरुवात केली. 

दोघांची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली. नूरनला विवियनची मुलाखत घेण्याची इच्छा होती. पण विवियनने अनेकदा मुलाखत टाळली. शेवटी एकदा तो हो म्हणाला आणि त्यांच्यात मैत्रीही झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.. विवियनला एका महिन्यातच हे कळून चुकलं होतं की त्याला नूरन आवडायला लागली आहे. 

विवियनने याआधी २०१३ मध्ये अभिनेत्री वाहबीज दोराबजीशी (Vahbbiz Dorabjee) लग्न केले होते. मात्र २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांची भेट 'प्यार की एक कहानी' या मालिकेच्या सेटवर झाली होती. 

टॅग्स :विवियन डसेनाटिव्ही कलाकार