Join us

‘PK’ ची 9 वर्षे पूर्ण, अभिनेत्यानं एकाच दिवसात खाल्ली होती 100 पानं, नेमका काय तो किस्सा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 1:38 PM

‘PK’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली होती.

चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे आतापर्यंत प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये 2014 साली प्रदर्शित झालेला 'PK' या चित्रपटाचे नाव आवर्जुन घेतले जाते. आज म्हणजेच 20 डिसेंबरला या चित्रपटाला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत.  ‘PK’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली होती. आमिरच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाचे काही रंजक किस्से आहेत. ते आपण आज या लेखातून जाणून घेऊया.

‘PK’ सिनेमातआमिर खानची व्यक्तिरेखा कायम पान खाताना दाखवण्यात आली होती. एका मुलाखतीदरम्यान आमिरने सांगितले होते की, त्याला पान खाण्याची सवय नाही. पण, चित्रपटातील पात्राच्या गरजेनुसार त्याला भरपूर पान खावे लागले होते. आमिरला दिवसातून 100 पान खावे लागले होते. ऐवढेच नाही तर सेटवर एक पान विक्रेता नेहमी हजर असायचा. खरंतर आमिरला पान न खाताही तो सीन करता आला असता. पण आमिरला त्या दृश्याला वास्तिवक टच द्यायचा होता. 

शिवाय चित्रपटात आमिर हा भोजपुरी भाषा बोलताना दिसला. यासाठी आमिरने खास भोजपुरी बोलण्याचे आणि शिकण्याचे प्रशिक्षण घेतले होते. भोजपुरी टीव्ही लेखक शांती भूषण यांनी आमिरला प्रशिक्षण दिले होते. शूटिंगदरम्यान ते नेहमी सेटवर हजर असायचे. याचाच परिणाम म्हणजे ‘PK’मध्ये तो अस्खलित भोजपुरी बोलताना पाहायला मिळाला. 

‘PK’ हा आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. पीकेमध्ये आमिरसोबत अनुष्का शर्माही दिसली होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतही सहाय्यक भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट 19 डिसेंबर 2014 रोजी प्रदर्शित झाला होता. पीके या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 340.8 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. या चित्रपटाने जगभरात 769.89 कोटींची कमाई केली होती.

टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा