लोकप्रिय बंगाली अभिनेत्री देबश्री रॉय यांच्या आई आणि राणी मुखर्जीच्या आजी आरती रॉय यांचे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या आणि त्यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्या मोठ्या मुलीसोबत राहत होत्या. त्यांच्या तीन मुलींच्या उपस्थितीत त्यांचे निधन झाले.
आरती रॉय यांच्या निधनाची माहिती त्यांची मुलगी देबश्री रॉय यांनी दिली आहे. देबश्री नेहमी त्यांच्या आईबद्दल बोलायच्या. त्यांनी म्हटले की, त्यांच्या आईमुळेच त्यांना चित्रपटांमध्ये पदार्पण करता आले आणि त्यांची कारकीर्द उंचीवर पोहोचली. एका टीव्ही मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, त्यांची आई तिला शूटसाठी सोबत घेऊन जायच्या. इतकंच नाही तर त्या त्यांना डान्सचे पोशाखही मिळवून देत असे.
माझी आई गेली....
देबाश्री रॉय म्हणाल्या होत्या की, 'माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे.' देबश्री रॉय शेवटच्या सर्वजन या चित्रपटात दिसली होती. आता त्यांनी एका मुलाखतीत म्हटले की, 'मला काही समजत नाही. माझी आई गेली. तिच्यामुळेच मी आज अभिनेत्री बनले आहे. त्यांना वयाशी संबंधित आजारांव्यतिरिक्त कोणताही आजार नव्हता. आम्ही तिघी बहिणी शेवटच्या क्षणी तिच्यासोबत होतो. अतिशय शांततेत तिचे निधन झाले.
२०२२ मध्ये झाली होती गंभीर दुखापत
देबश्री रॉय यांच्या आईला ऑगस्ट २०२२ मध्ये गंभीर दुखापत झाली होती. त्या म्हणाल्या होत्या की, 'माझी आई माझ्या मोठ्या बहिणीसोबत राहते. ती पडली आणि कपाळावर आदळली. तिचे खूप रक्त वाया गेले आणि ती बेशुद्ध झाली. आरती रॉय ही राणी मुखर्जीची आजी आहे, तिची आई कृष्णा मुखर्जी देबश्रीची बहीण आहे.