Join us  

'जवान'चा बोलबाला होत असतानाच 'पुष्पा २'ची नवीन अपडेट; अभिनेत्रीनं शेअर केला सेटवरचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 10:28 AM

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2:The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. जो २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2:The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. "पुष्पा: द राइज" या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आणि लोकांमध्ये त्याची क्रेझ जबरदस्त होती. अल्लू अर्जुनने साकारलेल्या पुष्पराजच्या भूमिकेची क्रेझ प्रत्येक पिढीत पाहायला मिळते. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत चाहत्यांमध्ये अशीच उत्सुकता आहे, जे सीक्वलशी संबंधित प्रत्येक छोट्या-मोठ्या अपडेटसाठी उत्सुक आहेत. आता या उत्साहात भर घालण्यासाठी, श्रीवल्लीची भूमिका साकारणारी राष्ट्रीय क्रश रश्मिका मंदान्ना हिने चित्रपटाच्या सेटवरील एक खास फोटो शेअर केला आहे.

रश्मिका मंदान्नाने पुष्पा २: द रुलच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे जो प्रेक्षकांना अशा जगात घेऊन जातो जे विशाल आणि भव्य असेल आणि चित्रपटाच्या कॅनव्हासमध्ये अंतर्दृष्टी देईल. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्याने लिहिले, "#pushpa2"

पुष्पा २: द रुलच्या सेटवरून समोर आलेल्या फोटोत पाहायला मिळत आहे की चित्रपटासाठी बंगल्याचा भव्य सेट बनवण्यात आला आहे. या खास फोटोमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची अपेक्षा पुढच्या स्तरावर नेली जाणार आहे. पुष्पा २ द रुलचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून यात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्या भूमिका आहेत. Mythri Movie Makers आणि Muttamsetty Media द्वारे निर्मित, हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना