'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा प्रेक्षकांचा लाडका शो. काहीच दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचा नवीन सीझन सुरु झालाय. पुन्हा एकदा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे सर्व कलाकार प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सर्वांची आवडती कलाकार म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. प्रियदर्शनीच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडलीय. त्याबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितलं आहे. काय घडलंय प्रियदर्शनीच्या आयुष्यात?
प्रियदर्शनीने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन लिहिलंय की, "The Shakespeare Globe... पुण्यात, मुंबईत, दिल्लीत .. आणि सगळी कडेच जिथे theatre ची चर्चा होते, या जागेचं नाव ऐकलं आहे. जगातल्या महत्वाच्या theatres पैकी एक. या जागी आल्यावर, इथल्या प्रेक्षकस्थानी बसल्यावर काही क्षण अश्रु थांबत नव्हते. इथली लाकडं साक्ष होती ५ शतकांची! खरंतर लाकडं म्हणजे मेलेली झाडं, पण या लाकडांना अमरत्व प्राप्त झालं असावं, रंगभूमीने त्यानाही जीवनदान दिलं असावं..
प्रियदर्शनी पुढे लिहिते की, "हाताने स्पर्श करुन आले.. कधीतरी पायांचाही स्पर्श व्हावा, या रंगभूमीला. एकट्या Shakespeare ने, किती क्रांती घडवावी ! या जागेने आणखीन प्रेरित केले! What a Legend!... “Who is it that can tell me who am I?” नावाचं poster जरा जास्त लक्षात राहीलं." अशाप्रकारे प्रियदर्शनीने तिला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय.