लिपस्टिक अंडर माय बुरखा, द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर यांसारख्या चित्रपटात अभिनेत्री अहाना कुमरा झळकली होती. प्रेक्षकांना तिच्या दोनही सिनेमांमधील भूमिकांना पसंती दिली होती. अहाना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अहाना नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते.
अहानाने काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानच्या बेताल या वेबसिरीजमध्ये दिसली होती. या वेबसिरीजची निर्मिती शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसने केली आहे.
ही वेबसिरीज अहानासाठी खास होती कारण ती स्वत: एसआरकेची मोठी फॅन आहे. एसआरकेद्वारा निर्मित वेबसिरीजचा भाग होणे म्हणजे अहाना तिचे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत असल्याचे अहानाने सांगितले होते. कारण अहाना शाहरुखची खूप मोठी फॅन आहे.
काही दिवसांपूर्वीच अहानाने तिच्या आई-वडील राहत असलेली सोसायटी कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सील करण्यात आली असल्याची माहिती दिली होती. मिड डेशी बोलताना अहानाने ही चिंता बोलून दाखवली. माझे आईवडिल राहत असलेली बिल्डींग पूर्णपणे सील करण्यात आली आहे. याघडीला हे सगळे करणे गरजेचे आहे, हे मला ठाऊक आहे. पण तरीही आईवडिलांच्या काळजीने माझी चिंता वाढली आहे. माझे सगळ्यात मोठी चिंता माझे वडील आहेत. कारण ते डायबेटिक आहेत. समाधानाची गोष्ट म्हणजे, बिल्डींगच्या गेटवर औषधे पुरवण्यात येत आहेत. माझ्या आईवडिलांनी गरजेचे सामान स्टॉक केले आहे. पण स्थिती लांबली तर सगळेच कठीण होईल. आम्ही कॉल करून एकमेकांला धीर देत आहोत. पण अशावेळी मी त्यांच्यासोबत नाही, हा विचार करून मला अपराध्यासारखे वाटू लागलेय. सध्या मी माझ्या बहीणीसोबत घाटकोपरला राहतेय.