Aai Kuthe Kay Karte: अरूंधती नेमकी गेली कुठे? समोर आली मोठी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 10:04 AM2022-06-26T10:04:06+5:302022-06-26T10:06:14+5:30
Aai Kuthe Kay Karte: काही एपिसोडमध्ये अरुंधती थोडी गायब असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अरूंधतीने अर्थात मधुराणीने ही मालिका सोडली की काय? असा प्रश्न चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मराठी मालिका. टीआरपी चार्टवर कायम टॉप 5 मध्ये राहिलेल्या या मालिकेबद्दल तूर्तास मोठी अपडेट समोर येतेय. आम्ही बोलतोय ते अरूंधतीची (Arundhati) भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिच्याबद्दल. काही एपिसोडमध्ये अरुंधती थोडी गायब असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अरूंधतीने अर्थात मधुराणीने ही मालिका सोडली की काय? असा प्रश्न चाहत्यांना प्रश्न पडला आहे. तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर आमच्याकडे आहे.
मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात आणि कुटुंबात सतत काही ना काही ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. सुरुवातीला साधीभोळी असणारी अरुंधती आता स्वत:च्या पायावर उभी झाली आहे. सध्या ती मोठ्या आत्मविश्वासाने प्रत्येक निर्णय घेत आहे. मात्र गेल्या काही एपिसोडमध्ये अरुंधतीचे सीन फारच कमी किंवा जवळजवळ दिसतच नसल्यानं चाहते नाराज आहेत. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर ही नाराजी बोलून दाखवली आहे. अरुंधती नेमकी गेली तरी कुठे? असा प्रश्न अनेक चाहते विचारत आहे. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अरूंधती गेल्या काही दिवसांपासून मालिकेतून गायब असली तरी तिने मालिका सोडलेली नाही. तर तूर्तास तिने ब्रेक घेतला आहे.
काही पर्सनल कारणासाठी काही दिवस ती सुट्टीवर आहे आणि त्यामुळे ती मालिकेत परतेपर्यंत सध्या संजना आणि अनिरुद्धवर फोकस केलं जात आहे. मराठी सिरियल्स डॉट कॉमने ही माहिती दिली आहे. अरुंधती अर्थात मधुराणी लवकरच मालिकेत परतणार हे मात्र नक्की आहे.
सध्या मालिकेत संजना आणि अनिरूद्ध यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. अनिरुद्ध चक्क संजनावर आरोप लावताना दिसून येत आहे. मालिकेत अनघाचा अपघात झाला आहे. ती जिन्यावरून उतरताना संजनाचा धक्का लागून खाली पडते. त्याचवेळी संजनासुद्धा तिथेच असते. त्यामुळे संजनाने अनघाला मुद्दाम धक्का दिला आहे,असा आरोप अनिरूद्ध करतो. हा महाएपिसोड आज रविवारी 26 जूनला रात्री 8 वाजता प्रेक्षेपित होणार आहे